Increase in number of vehicles and accidents in Pune : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख मिरविणाऱ्या पुण्यात वाहनांच्या आणि अपघातांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. पुण्यात 2022-23 या आर्थिक वर्षात 2 लाख 92 हजार वाहने वाढली आहे. तसेच मागील 3 महिन्यात पुण्यात अपघातामध्ये 100 जणांचा मृत्यू झाला. अपघाती मृत्यूमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे.
कोरोना संकटाच्या काळात मंदावलेली वाहन खरेदी पुन्हा वाढली आहे. यामुळे पु्ण्यातील वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. पुण्यामध्ये 2021-22 या आर्थिक वर्षात वाहनांची संख्या 1 लाख 70 हजार 537 ने वाढली. तर 2022-23 या आर्थिक वर्षात पुण्यातील वाहनांची संख्या 2 लाख 92 हजार 258 ने वाढली. पुण्यातील ई-वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे.
दुचाकींची संख्या वेगाने वाढत असली तरी पुण्यातील रस्ते तेवढे विस्तारलेले नाहीत. यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याचे चित्र आहे. पुण्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. यामुळेही अपघात होत आहेत. पुणे शहरात जानेवारी 2023 ते मार्च 2023 या काळात 96 अपघातांमध्ये 100 जणांचा मृत्यू झाला आणि 164 जण जखमी झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम आणि सुरक्षेचे उपाय याबाबत जनजागृती करूनही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स
उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे