पुणे : सध्या देशभरात पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदीवरील (Narendra Modi)माहितीपटामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘बीबीसी’ (BBC)ने तयार केलेली‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’('India: The Modi Question') या माहितीपटाच्या प्रदर्शनावरून राजकारण तापलं आहे. केंद्र सरकारनेही (Central Govt) या माहितीपटावर बंदी घातली असतानाही देशातील विविध शिक्षणसंस्थांमध्ये हा माहितीपट दाखवण्यात येत आहे. आधी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Jawaharlal Nehru University) (जेएनयू) आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात हा माहितीपट दाखवण्यात आल्यानंतर बीबीसीचा ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन ही डॉक्युमेंटरी राज्यातील पुणे आणि मुंबईमध्ये दाखवण्यात आली. (India: The Modi Question is also on display at FTII, TISS)
अधिक वाचा : रणबीरने रागाने फेकला फॅनचा फोन की आणखी काही?
पुण्यातील ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) या संस्थेत विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या रात्री हा माहितीपट दाखविण्यात आला, तर मुंबईतही ‘टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस’च्या (टिस) (Tata Institute of Social Sciences) विद्यार्थ्यांनीही शनिवारी तो कॅम्पसमध्ये पाहिला. दरम्यान, भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘टिस’विरोधात आंदोलन केलं होतं. गुजरात दंगलीवरील हा माहितीपट असल्याने भाजपकडून याच्या सादरीकरणाला विरोध होत आहे. या माहितीपटावर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे. हा माहितीपट विविध वेबसाइटवरुन हटविण्यात आल्यानंतरही काही वेबसाइटवर तो उपलब्ध आहे.
अधिक वाचा : Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल रविवारचा दिवस
दरम्यान सुरुवातीला जेएनयू आणि जामिया मिल्या इस्लामिया या विद्यापीठात हा माहितीपट सादर करण्यात आला होता. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठासह काही शिक्षण संस्थांमध्ये या माहितीपटावरून गोंधळ झाला होता. तर ‘एफटीआयआय’मध्ये प्रजासत्ताकदिनी, 26 जानेवारीला या माहितीपटाचे सादरीकरण करताना कोणताच गोंधळ झाला नाही.
अधिक वाचा : अदानी ग्रुपमुळे एलआयसीला 18,300 कोटी रुपयांचा तोटा
जेएनयूमध्ये सादरीकरण होत असताना जेएनयू प्रशासनाने वीज खंडित केल्याने दगडफेक झाली होती. त्यात काही विद्यार्थी जखमी झाले; तसेच जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सादरीकरणाआधी चार विद्यार्थांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. या प्रकारांचा निषेध म्हणून पुण्यात ‘एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन’तर्फे 26 जानेवारीला रात्री दहा वाजता व्हिज्डम ट्रीजवळ मोकळ्या जागेत पडद्यावर हा माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी सुमारे शंभर विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक वाचा : थंडी झाली कमी पण..., जाणून घ्या कसे असेल हवामान
‘साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट आणि प्रसारमाध्यमांवर बंदी घालणे हे ढासळलेल्या समाजाचे लक्षण आहे. लोकशाही देशात चित्रपटांवर बंदी घातली जाऊ शकत नाही. ‘बीबीसी’चा माहितीपट देशातील हिंसाचार अधोरेखित करतो. माहितीपट पाहून भारतातील कोणीही आश्चर्यचकित झाले, तर ते जास्त धक्कादायक आहे. जातीय आणि धार्मिक हिंसाचार सत्ताधारी पक्षाच्या राजकारणाचा एक भाग झाला आहे.
चित्रपट पाहणे हे सेन्सॉरशिपला उत्तर आहे. कोणी काय पाहावे हा निर्णय नागरिकांवर सोडून दिला पाहिजे, इतकेच आम्हाला या सादरीकरणाद्वारे म्हणायचे आहे’,अशी भूमिका स्टुडंट असोसिएशनतर्फे मांडण्यात आली. माहितीपटावरील बंदीचे समर्थन केल्याबद्दल प्रख्यात दिग्दर्शक आणि ‘एफटीआयआय’चे अध्यक्ष शेखर कपूर यांचा विद्यार्थांनी निषेध केला.