Indian cricketer Kedar Jadhav father goes missing in Pune : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव जाधव बेपत्ता झाले आहेत. महादेव जाधव यांचा मोबाईल बंद आहे. वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही यश मिळालेले नाही. यामुळे जाधव कुटुंबाकडून पुण्यात कोथरूडच्या अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी संपूर्ण पुण्यात महादेव जाधव यांचा शोध सुरू केल्याचे वृत्त आहे.
महादेव जाधव 85 वर्षांचे आहेत. ते कोथरूड येथून कर्वेनगरला जात असताना काही जणांनी बघितले होते. पण पुढे ते कुठे गेले याची माहिती मिळालेली नाही. सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी घरातून बाहेर पडलेले महादेव जाधव अद्याप परतलेले नाहीत. कोणाचाही महादेव जाधव यांच्याशी संपर्क झालेला नाही.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार महादेव जाधव सिटी प्राईड कोथरूड येथून रिक्षात बसून निघाले होते. त्यांना रिक्षातून कर्वेनगरला जात असताना काही जणांनी बघितले होते. महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, त्यामुळे त्यांना कोणीही पाहिल्यास त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन जाधव कुटुंबाने केले आहे.
क्रिकेटपटू केदार जाधव त्याच्या कुटुंबासह पुण्यात कोथरूड परिसरात वास्तव्यास आहे. केदारचे वडील महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. यामुळे त्यांना घराबाहेर एकट्याने पाठवले जात नाही. पण दुपारी महादेव जाधव थोडा वेळ फिरायला जातो असे सांगून घराखालील मेन गेटजवळ गेले होते. काही वेळ चकरा मारल्यानंतर ते गेटमधून बाहेर पडले आणि निघून गेले. हा प्रकार लक्षात येताच शोध सुरू झाला. अद्याप महादेव जाधव सापडलेले नाहीत तसेच त्यांच्याशी कोणाचाही संपर्क झालेला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने शोध सुरू केला आहे.
परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी करा हे उपाय
टक्कल आणि केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी पुरुषांसाठी नैसर्गिक तेल