Ink Attack on Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकमुळे पोलिसांच्या नोकरीवर डाग; 11 पोलीस कर्मचारी सस्पेंड

पुणे
भरत जाधव
Updated Dec 11, 2022 | 10:42 IST

Ink Attack on Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपमधील वजनदार नेत्यांपैकी एक आहेत. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. आता ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याभोवती नेहमीच कडेकोट सुरक्षा असते. मात्र, ही सुरक्षा भेदून समता दलाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याने सुरक्षेवर  प्रश्न उपस्थित होत आहेत.

11 police personnel suspended due to Ink Attack on Chandrakant Patil
चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकमुळे पोलिसांच्या नोकरीवर डाग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेक
  • चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपमधील वजनदार नेत्यांपैकी एक आहेत.
  • पाटलांवरील शाईफेकीच्या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Chandrakant Patil police suspnded: मुंबई: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राचे (Maharashtra) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री (Minister of Higher and Technical Education)चंद्रकांत पाटील  (Chandrakant Patil)यांच्यावर शाईफेक झाली. शाईफेक होताच पोलिसांनी शाई फेकणाऱ्या व्यक्तीच्या लगेच मुसक्या आवळल्या. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपमधील वजनदार नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्यावर शाईफेक झाल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या शाईफेकसाठी प्रवृत्त करण्याप्रकरणी बारामतीमध्ये पोलिसांनी राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या शाईफेकीचा डाग काही पोलिसांच्या खाकीवरही लागला आहे.  (Ink Attack on Chandrakant Patil:  11 police personnel suspended due to Ink Attack on Chandrakant Patil)

अधिक वाचा  : Share करा संकष्ट चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा !

शनिवारी संध्याकाळी पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर  शाई फेकली होती. पोलिसांची सुरक्षा भेदून समता दलाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी थेट पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी आता गृहमंत्रालयाकडून त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पाटलांवरील शाईफेकीच्या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी 11 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

अधिक वाचा  : हुश्श, भारत तिसरी वन डे जिंकला, बांगलादेशचा दारुण पराभव

निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये  8 पोलीस कर्मचारी आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारा व्यक्ती हा पोलिसांच्या ताब्यात आहे. हा व्यक्ती समता सैनिक दलाचा कार्यकर्ता असून या दलाच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  चंद्रकांत पाटील हे शनिवारी मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. या कार्यक्रमाला जायच्या आधी ते कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरातून निघताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. ही शाईफेक झाल्यानंतर शाई फेकणाऱ्यांनी 'निषेध असो, निषेध असो', 'चंद्रकांत पाटील यांचा धिक्कार असो', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा विजय असो', 'महात्मा फुले यांचा विजय असो',अशा घोषणा दिल्या होत्या.

अधिक वाचा  : धक्कादायक, 50 गुंडांच्या टोळक्याने केले महिला डॉक्टरचे अपहरण

 शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी काही वेळातच प्रसारमाध्यमांसमोर येत आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली होती. माझ्यावर असे भ्याड हल्ले झाले तरी मी घाबरणार नाही. विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासमोर येऊ दाखवावे, असे चंद्रकांत पाटील यांनी त्वेषाने सांगितले होते. 

पोलिसांवर कारवाई न करण्याची विनंती

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपमधील वजनदार नेत्यांपैकी एक आहेत. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. आता ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याभोवती नेहमीच कडेकोट सुरक्षा असते. मात्र, ही सुरक्षा भेदून समता दलाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याने सुरक्षेवर  प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्यात पोलिसांचा कोणताही दोष नसल्याचे सांगितले होते.

शाईफेकसाठी 51 हजार रुपयांचे बक्षीस

ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्याला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी आता 14 जणांवर बारामतीत गुन्हा दाखल झाल आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून जो कोणी चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे काम करेल. त्याला 51 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण शोशल मीडियावर व्हायरल केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी