Ink Was Thrown On The Face Of Minister Chandrakant Patil In Pimpri Chinchwad : महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेल्यांची पोलीस चौकशी सुरू आहे.
याआधी शुक्रवार 9 डिसेंबर 2022 रोजी संतपीठाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणसंस्था उभारण्यासाठी सरकारी अनुदानाची वाट बघितली नाही... असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे चंद्रकांत पाटील म्हणाले. या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण तापले. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात काही ठिकाणी आंदोलने झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. यानंतरही चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत.
चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवडमध्ये आले असताना आंदोलकांनी त्यांच्यावर शाई फेकली. या घटनेनंतर झुंडशाही सुरू असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. शब्दाला शब्दांनी उत्तर द्यावे. हिंमत असेल तर समोर या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील हे भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथून बाहेर पडताना त्यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली. शाई नेमकी कोणी फेकली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.