Pune: जेजुरीत मोठी दुर्घटना, कंपनीत लोखंड वितळवून तयार झालेला लोहरस कामगारांवर पडला, 8 जण होरपळले

Big news from Pune: पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका कंपनीत लोखंड वितळवून तयार करण्यात आलेला लोहरस कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडल्याने अनेकजण होरपळले आहेत. 

Iron melted liquid fall on company employees in jejuri pune district of maharashtra
Pune: जेजुरीत मोठी दुर्घटना, कंपनीत लोखंड वितळवून तयार झालेला लोहरस कामगारांवर पडला, 8 जण होरपळले 
थोडं पण कामाचं
  • जेजुरीतील कंपनीत घडली मोठी दुर्घटना
  • लोखंड वितळवून तयार केलेला लोहरस कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडला
  • क्रेनची दोरी तुटल्याने घडली दुर्घटना, 8 जण होरपळले

Pune News: पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जेजुरी जवळील एका कंपनीत लोखंड वितळवण्याचे काम सुरू होते. हे लोखंड वितळवल्यानंतर ते वाहून नेण्यासाठी असलेल्या लॅडरची साखळी तुटली आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर लोहरस पडला. या दुर्घटनेत 8 कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. (Iron-melted liquid fall on company employees in jejuri pune district of maharashtra)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेजुरीतील मोरगाव रोडवर असलेल्या आयएसएमटी या कंपनीत ही दुर्घटना घडली आहे. या कंपनीत लोखंडी सळई बनवल्या जातात. त्यासाठी कंपनीत मोठ्या प्रमाणात लोखंड वितळवण्यात येते. हे लोखंड 1600 ते 1800 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानात वितळवण्यात येते.

हे पण वाचा : हिवाळ्यात चुकूनही खाऊ-पिऊ नका हे 6 पदार्थ

यानंतर लोखंडापासून लोहरस तयार होतो. हे लोहरस एका वाहून नेण्यासाठी एका क्रेनचा वापर केला जातो. या क्रेनची एक लोखंडी साखळी तुटली आणि त्यामुळे हे लोहरस तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडले. यामुळे कर्मचारी होरपळले. कंपनीतील एकूण 8 कर्मचारी होरपळले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कंपनीत एकच खळबळ उडाली.

हे पण वाचा : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे - जितेंद्र सिंग, सुजित बरकडे, दुर्गा यादव, शिवाजी राठोड, चुनेज बरकडे, अरुणकुमार सिन्हा, आकाश यादव आणि मनोरंजन दास. जखमी सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी