साताऱ्यातील बामणोलीचे प्रथमेश पवार जम्मूत हुतात्मा

पुणे
रोहन जुवेकर
Updated May 21, 2022 | 22:55 IST

jawan prathamesh pawar hutatma in jammu : साताऱ्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र प्रथमेश संजय पवार सीमा सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत होते. जम्मू येथे दहशतवाद्यांशी लढताना ते हुतात्मा झाले.

jawan prathamesh pawar hutatma in jammu
साताऱ्यातील बामणोलीचे प्रथमेश पवार जम्मूत हुतात्मा 
थोडं पण कामाचं
  • साताऱ्यातील बामणोलीचे प्रथमेश पवार जम्मूत हुतात्मा
  • प्रथमेश पवार यांचे पार्थिव रविवार २२ मे २०२२ रोजी मूळगावी येणार असल्याचे प्राथमिक वृत्त
  • फक्त २२ वर्षांचे होते प्रथमेश पवार

jawan prathamesh pawar hutatma in jammu : साताऱ्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र प्रथमेश संजय पवार सीमा सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत होते. जम्मू येथे दहशतवाद्यांशी लढताना ते हुतात्मा झाले. प्रथमेश पवार यांचे पार्थिव रविवार २२ मे २०२२ रोजी मूळगावी येणार असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. 

सीमा सुरक्षा दलात जवान म्हणून प्रथमेश पवार तीन महिन्यांपूर्वी दाखल झाले होते. फक्त २२ वर्षांचे असलेले प्रथमेश पवार जम्मू येथे कर्तव्यावर होते. गुरुवार १९ मे २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दहशतवाद्यांशी लढताना ते हुतात्मा झाले. जम्मूतील सांबा ब्लॉक येथे चकमक झाली. दहशतवाद्यांची गोळी लागल्यामुळे जवान प्रथमेश पवार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने घरी फोन करून घटनेची माहिती दिली.    

प्रथमेश पवार यांचे प्राथमिक शिक्षण मूळगावी झाले. यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पाचवडमध्ये पूर्ण केले. आर्मी सिलेक्शन सुरू असताना प्रथमेश पवार यांनी प्रयत्न केला आणि त्यांची निवड झाली. त्यांना कठोर प्रशिक्षणासाठी बेळगाव येथे पाठविण्यात आले. खडतर प्रशिक्षण घेऊन झाल्यावर प्रथमेश पवार यांची नियुक्ती जम्मूत झाली होती. त्यांच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी