Jayant Patil | राज्यसभा निवडणुकीतील पराभवामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज – जयंत पाटील

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Jun 12, 2022 | 21:26 IST

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

थोडं पण कामाचं
  • राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला
  • शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत
  • मुख्यमंत्री ठाकरे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू

Jayant Patil : सातारा : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले की, ज्या अपक्षांनी आम्हाला आधी पाठिंबा दिला होता, त्यापैकी ४-५ अपक्षांनी आम्हाला मतदान केले नाही. परंतु हे फार काळजीचे कारण नाही. या मुळे महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची टीका विरोधकांनी केली होती परंतु या टीकेला काही अर्थ नाही असे पाटील म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला, यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले आहेत त्यासाठी राज्यसभा निवडणुकीचे योग्य विश्लेषण करून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करत असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी