Ketaki Chitale : केतकीने शरद पवारांचा उल्लेख केलेलाच नाही, तृप्ती देसाई यांनी घेतली बाजू, राष्ट्रवादीच्या कर्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated May 16, 2022 | 17:11 IST

अभिनेत्री केतकी चितळे हिने तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह  फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर तिला अटक देखील करण्यात आली आहे. परंतु केतकीने आपल्या फेसबुक पोस्टवर शरद पवारांचा उल्लेख केलाच नव्हता असे म्हणत देसाई यांनी केतकीची बाजू घेतली.

tripti desai
तृप्ती देसाई   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री केतकी चितळे हिने तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह  फेसबुकवर पोस्ट केली होती.
  • त्यानंतर तिला अटक देखील करण्यात आली आहे.
  • केतकीने आपल्या फेसबुक पोस्टवर शरद पवारांचा उल्लेख केलाच नव्हता असे म्हणत देसाई यांनी केतकीची बाजू घेतली.

Ketaki Chitale : पुणे : अभिनेत्री केतकी चितळे हिने तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह  फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर तिला अटक देखील करण्यात आली आहे. परंतु केतकीने आपल्या फेसबुक पोस्टवर शरद पवारांचा उल्लेख केलाच नव्हता असे म्हणत देसाई यांनी केतकीची बाजू घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रमाणे केतकीला ट्रोल केले आहे त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. (ketaki chitale dosent mention sharad pawar in fb post says tripti desai)

देसाई म्हणाल्या की, चितळेला ज्या पद्धतीने कलम लावण्यात आल्या आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने चितळे हिला ट्रोल केलं जातं आहे हे चुकीचं आहे. एका महिलेला अशा पद्धतीने ट्रोल करणे चुकीचं आहे. असे मत भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच एखाद्या विशिष्ट नेत्यांच्या विरोधात जेव्हा आक्षेपार्ह पोस्ट केली जाते तेव्हा तिला अटक होते. पण जेव्हा एखादा ट्रोलर जेव्हा आम्हाला ट्रोल करतो किंवा आमच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करतो तेव्हा त्या ट्रोलरवर गुन्हा दाखल होत नाही. हे चुकीचं आहे असेही देसाई म्हणाल्या. तसेच केतकी चितळे हिने शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही त्यामुळे तिला या प्रकरणात न्यायालयात हे केस टिकणार नाही, असेही देसाई यांनी नमूद केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी