Khanapur Nagar Panchayat Result 2022 : सांगली : राज्यात झालेल्या नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat) निवडणुकांचा (Election) निकाल (Result) काल हाती आला. या निकालात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) भाजपाला (BJP) चांगलेच मागे फेकलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं 62 नगरपंचायतीवर आपला झेंड फडकवला आहे. या निकालावरुन महाविकास आघाडीने टीका करणाऱ्या अनेक भाजपच्या नेत्यांना त्यांचा रस्ता दाखवला आहे. महाविकास आघाडी सरकारवर या ना त्या मुद्यावरून बेछूट टीका करणारे भाजपचे आमदार (BJP MLA ) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना चांगलाच धक्का बसला आहे. खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस (Congress)-शिवसेना (Shivsena) महाविकास आघाडीने 9 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. पण पडळकर यांच्या पॅनलला साधा भोपळाही फोडता आला नाही. (Khanapur Nagar Panchayat Congress-Shivsena beat to Gopichand Padalkar)
गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर टीकेची एकदाही संधी सोडली नाही. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात महाविकास आघाडीने गोपीचंद पडळकरांना पूर्ण गप्प केलं. खानापूर नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारली आहे. एकूण 9 जागा जिंकून महाविकास आघाडीने सत्ता ताब्यात घेतली आहे. तर जनता आघाडी ७ जागी आणि अपक्षाने १ जागा जिंकली आहे. या निवडणुकीमध्ये राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार अनिल बाबर यांचे पॅनल विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले पॅनल उतरवले होते. पण या पॅनलचा पुरता धुवा उडाला आहे. या पॅनलला साधे खाते सुद्धा उघडता आलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. सरकारमधील गोंधळ, ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण, भ्रष्टाचार यावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करीत भाजपने प्रचारात वातावरण तापवले होते. सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी भाजपला एकतर्फी यश मिळालेले नाही.
दरम्यान, भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Central Minister Raosaheb Danve) यांना शिवसेना नेते आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी जोराचा झटका दिला आहे. कारण सोयगाव नगरपंचायतीत आपण जिंकणार असा दावा करणाऱ्या दानवेंना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.