पिंपरी चिंचवड : माणूस चंद्रावर पोहचला आणि मंगळवर मिशन केले आहे. आपल्या समाजातून अंधश्रद्धेचे (Superstition)भूत अजूनही काही गेलेले नाही. अंधश्रद्धेपायी चिमुरडीला बळी देण्याच्या प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याजवळ झाला आहे. पिंपरी चिंचवड आणि जुन्नर मध्ये अशा घटना समोर आल्या आहेत. गुप्तधन हवे असेल तर लहान मुलीचा बळी (sacrifice)द्यावा लागेल असे एका भोंदू बाबाने जुन्नरमधील (junnar) एका कुटुंबाला सांगितलं आणि अंधश्रद्धेचे भूत झपाटलेल्या या कुटुंबाने एका चिमुरडीचे बळीसाठी अपहरणही केले. (Kidnapping of a little girl for the greed of secret money, sacrifice was to be offered on Amavasya)
बळी देण्यासाठी या कुटुंबाने पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या 4 वर्षीय मुलीला पळवून नेले. परंतु, पोलिसांच्या जागृकतेने आणि तातडीने पाऊले उचलल्याने त्यांचा हा कट उधळला गेला आणि पोलिसांनी या अंधश्रद्धेपायी बेभान झालेल्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी विमल संतोष चौगुले, संतोष मनोहर चौगुले, सुनीता अशोक नलावडे, निकिता अशोक नलावडे यांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अधिक वाचा : कोथिंबिरीच्या पाण्याने चेहऱ्यावर येईल चमक
कोणत्याही क्राइम स्टोरीला लाजवेल असा कट या मुलींचे अपहरण करण्यासाठी चौघुले कुटुंबाने रचला. बहिणीच्या घरी राहण्याच्या बहाण्याने गेले. आपली बहीण विमल नलावडे यांच्या घरी त्यांनी मुक्काम ठोकला. त्या नंतर कुटुंबातील लहान मुलांच्या मदतीने शेजारीच राहणाऱ्या 4 वर्षीय मुलीला चॉकलेट देणे, आईस्क्रीम देणे असा प्रकार सुरू केला. त्यांचा हा प्लान यशस्वी होत होता.
अधिक वाचा : मधुमेहासाठी ही विविध पाने आहेत अमृत
आपल्याला कायम चॉकलेट आणि आइस्क्रिम मिळते म्हणऊन ती चिमुरडी नलावडे यांच्या घरी कायम जाऊ येऊ लागली. ओळख झाल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलाच्या मदतीने तीचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी चिखली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची सूत्र वेगाने फिरवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासलं.
अधिक वाचा : मका खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, अन्यथा...
सीसीटीव्ही मध्ये मुलीला घेऊन जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आणखी तपास केला. आरोपी मुलीला जुन्नरमध्ये घेऊन गेले असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्याची माहिती जुन्नर पोलिसांना देण्यात आली. जुन्नर पोलिसांनी ही त्यावर तात्काळ कारवाई करत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मदतीने आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या तत्परतेमुळे एका चिमुरडीचे प्राण वाचल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.