सांगलीत हॉस्पिटलमधून एका दिवसाच्या बाळाचे अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे
भरत जाधव
Updated Jul 24, 2022 | 20:14 IST

सांगलीच्या (Sangli) तासगावमध्ये हॉस्पिटलमधून एका दिवसाच्या बाळाचे अपहरण (Baby Kidnapping) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नर्स असल्याचे भासवून एका महिलेने या बाळाचे अपरहण केले आहे. डॉ. अंजली पाटील (Dr. Anjali Patil) यांच्या हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे.

One day old baby kidnap in sagali
सांगलीत हॉस्पिटलमधून एका दिवसाच्या बाळाचे अपहरण  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • या हॉस्पिटलमध्ये चिंचणी येथील हर्षदा शरद भोसले ही महिलेला प्रसूतीसाठी शुक्रवारी दाखल झाली होती.
  • अपहरण करणारी महिला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हॉस्पीटला कामाला लागली होती.

sangli News : सांगलीच्या (Sangli) तासगावमध्ये हॉस्पिटलमधून एका दिवसाच्या बाळाचे अपहरण (Baby Kidnapping) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नर्स असल्याचे भासवून एका महिलेने या बाळाचे अपरहण केले आहे. डॉ. अंजली पाटील (Dr. Anjali Patil) यांच्या हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी महिला बाळाला एका पिशवीमध्ये घालून घेऊन गेली. दरम्यान ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTv Footage) कैद झाली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांकडून (Tasgaon Police) आरोपी महिलेचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी आठच्या सुमारस घडली आहे. या हॉस्पिटलमध्ये चिंचणी येथील हर्षदा शरद भोसले ही महिलेला प्रसूतीसाठी शुक्रवारी दाखल झाली होती. या महिलेने शनिवारी मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यानंतर या महिलेची प्रकृती चांगली असून बाळ आणि तिच्यावर या हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या महिलेच्या एका दिवसाच्या बाळाचे आज अपहरण झाले. 

Read Also : महाराष्ट्रात १४६९२ कोरोना Active, आज २०१५ रुग्ण, ६ मृत्यू

अपहरण करणारी महिला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आपण नर्स असल्याचे भासवून हॉस्पिटलमध्ये कामाला लागली होती. या महिलेनेच या बाळाचे अपहरण केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी सकाळी ही महिला संबंधितांच्या वॉर्डमध्ये गेली. तिथून या महिलेने अतिशय हुशारीने एका दिवसाच्या बाळाला घेतले. आपल्या जवळ असलेल्या पिशवीमध्ये बाळाला ठेवले आणि ही पिशवी घेऊन ही महिला त्याठिकाणावरुन फरार झाली.

Read Also: टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करणे तब्येतीसाठी घातक

याप्रकरणी तासगाव पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणाचा तासगाव पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी