पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर, १५ लाख न देता चार लाखांवर महिलेची बोळवण

Kidney Racket: FIR Registered Against Pune’s Ruby Hall Clinic Management, Doctors, Patient And Kidney Donor : पुणे पोलीसांनी किडनी तस्करी प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुबी हॉल क्लिनिकचे (Ruby Hall Clinic) प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह रुग्णालयातील सहा डॉक्टरांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे.

Kidney Racket: FIR Registered Against Pune’s Ruby Hall Clinic Management, Doctors, Patient And Kidney Donor
पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुणे पोलीसांनी किडनी तस्करी प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला
  • परवेझ ग्रांट यांच्यासह रुग्णालयातील सहा डॉक्टरांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल
  • ज्या महिलेची किडनी काढण्यात आली त्या महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे  : पुणे पोलीसांनी किडनी तस्करी प्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुबी हॉल क्लिनिकचे (Ruby Hall Clinic) प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह रुग्णालयातील सहा डॉक्टरांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, सदर प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करून यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावर देखील पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

अधिक वाचा : Air Force चा जवान हनी ट्रॅपमध्ये अडकला, पोलिसांकडून अटक

अशी झाली होती फसवणूक?

सदर घटनेतील फिर्यादी असलेली महिलेचे नाव सारिका सुतार असं आहे. सारिका सुतार हीने आपली फसवणूक करून किडनी काढल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनावर केला होता. घटनेचे गम्भीय ओळखून पोलिसांनी तत्काळ सखील चौकशी सुरु केली या चौकशीत मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सारिका सुतार या महिलेनेच आपली किडनी १५ लाख रुपयांच्या बदल्यात दुसऱ्या व्यक्तीला देण्याचे ठरवले होते. त्यासाठी सारिका सुतार यांची बनावट नावाने कागदपत्रं देखील तयार करण्यात आली होती. मात्र सारिका सुतार यांना ठरल्याप्रमाणे १५ लाख रुपये देण्यात आले नाहीत. सुतार यांना फक्त चार देण्यात आले होते. आणि म्हणून त्यांनी तक्रार दिल्याचे पोलीसांना चौकशीत आढळून आलं आहे. ही फसवेगिरी करण्यात रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर आणि व्यवस्थापनातील अधिकारी देखील त्यामधे सहभागी असल्याच पोलीसांना चौकशीत आढळून आलं. त्यानंतर पोलीसांनी सर्वांच्याच विरोधात गुन्हा नोंद केला असून, पोलीस सदर घटनेप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

अधिक वाचा : सूर्याच्या संक्रमणामुळे येणार 'अच्छे दिन, वाचा सविस्तर

यापूर्वी आरोग्य विभागाने कारवाई करत रूबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.  

दरम्यान, सारिका सुतार या महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती समोर आलो आहे. मात्र , आमिष दाखवून किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले१५ लाख रुपये पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी सदर धक्कादायक किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. या तक्रारीवरुन रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी  हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता. यानंतर देखील सदर प्रकार उघडकीस आला असून, यावर प्रशासन काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक  वाचा : तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी