Pune City Camp police : पुणे : पोलिसांची (police) ड्यूटी म्हटलं म्हणजे खूप अवघड काम. कधी कोणती ड्यूटी लागेल हे काही सांगता येत नाही. पोलीस कर्मचाऱ्यांना कामाचा मोठा तणाव असतो. या वाढलेल्या ताणामुळे (stress) पोलिसांच्या वर्तनातही बदल होत असतात, याचा परिणाम त्यांच्या कार्यशैलीवर होत असतो.या गोष्टीची दखल घेत पुणे शहर छावणी (Pune City Camp) क्षेत्रातील पोलीस स्टेशनने एक अगळा-वेगळा उपाय शोधला. या पर्यायामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा ताण कमी झाला शिवाय त्यांच्या कामात मोठी सुधारणा झाली. (Kishore Da, Lata Didi and Rafi came to help to relieve the stress of Pune Police )
अधिक वाचा : आसाराम बापू बलात्कार प्रकरणात दोषी
स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांचा तणाव कमी करण्यासाठी लता दिदी, रफी साहेब, किशोर दा ची मदत घेतली आहे. आपली ड्यूटी संपली या स्टेशनमधील पोलीस कर्मचारी लता दिदी, किशोर दा यांच्या मदतीने आपला ताण कमी करतात. भारतातील सुप्रसिद्ध हे दिग्गज दिवंगत गायकांमुळे पोलीस कर्मचारी आपला कामाचा ताण एका झटक्यात विसरुन जातात.
अधिक वाचा : तुकाराम महाराजांच्या वंशजांनी दाखवला मनाचा मोठेपणा
पोलिसांचा तणाव करण्यासाठी पुणे छावणी पोलीस स्टेशनमध्ये एक म्युझिक रुम तयार केला आहे. Karaoke सिस्टम, स्पीकर्स आणि साउंड मिक्सर सर्व उपकरणं या बसविण्यात आली आहेत. सांयकाळी आपले काम संपल्यानंतर पोलीस कर्मचारी या रुममध्ये आल्यानंतर लता मंगेशर, किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि इतर गायकांचे गाणे मनसोक्त गात असतात.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले, “कोविड-19 चा कहर कमी झाल्यानंतर आमच्या कर्मचार्यांना तणावमुक्त करण्यासाठी आम्ही संगीत थेरपिस्ट डॉ. संतोष बोराडे यांच्या मदतीने संगीत थेरपी सत्र आयोजित केले. ’डॉ.बोराडे यांच्या सूचनेवरून पोलीस ठाण्यात छोटे स्पीकर व माईक लावण्यात आला. कदम म्हणाले, “आमचे पोलीस स्टेशन नेहमीच बंदोबस्ताच्या कर्तव्याच्या दबावाखाली असते. पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते, कामाचा ताण कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अशा (मानसिक) आरामाची गरज होती.
माईक आणि स्पीकर मिळाल्यानंतर अनेक पोलिस ठाण्यातील पोलिस गाण्याचा आनंद घेऊ लागले. त्यानंतर अधिकार्यांनी कराओके सिस्टीम, मिक्सर आणि सिंगिंग माईक यांसारखी काही उच्चस्तरीय उपकरणे खरेदी करावीत असा विचार केला. एका स्थानिक गुरुद्वाराने त्यांना उपकरणे मिळवून देण्यास मदत केली. कदम म्हणाले, "आज आमच्याकडे पोलीस अधिकारी आणि हवालदारांसह सुमारे 15 पोलीस आहेत, जे नियमितपणे संगीत कक्षात गातात." पोलिस आयुक्त आणि सह पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उपक्रमाची माहिती घेत पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.
उपनिरीक्षक विनायक गुर्जर यांना नेहमीच गाण्याची आवड होती, परंतु त्यांच्या नोकरीमुळे हा छंद त्यांना विसरावा लागला. परंतु संगीत कक्ष सुरू झाल्यापासून ते आता ड्युटीनंतर दररोज त्यांच्या आवडत्या संगीताचा सराव करतात. ते म्हणाले की, 'आमच्यापैकी सुमारे पंधरा कर्मचारी संध्याकाळी 7 नंतर म्युझिक रूममध्ये जमतात आणि गातात.' ते पुढे म्हणाले की काहीवेळा स्थानिक संगीत प्रेमी देखील संगीत सत्रासाठी त्यांच्यात सामील होतात. या स्टेशनमधील
पोलीस हेड कॉन्स्टेबल रहिशा शेख ह्याही या संगीत कक्षात दिवसभराचे काम संपवून थोडा वेळ गाण्याचा सराव करतात.
अधिक वाचा : बायको हरविल्याची तक्रार करायला गेला आणि अडकला
निरीक्षक कदम यांच्या म्हणण्यानुसार, तणावाची पातळी कमी झाल्यामुळे कामाची उत्पादकता देखील वाढली आहे. कर्मचाऱ्यांना कोणतेही अतिरिक्त अधिकृत काम सोपवल्यास तक्रार करत नाहीत. कदम म्हणाले, "या उपक्रमाचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की, जे कर्मचारी सहसा आपल्या वैयक्तिक समस्या मांडत नव्हते किंवा कोणाला सांगत नव्हते ते आता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने बोलू लागले आहेत."