खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत

पुणे
रोहन जुवेकर
Updated Aug 12, 2022 | 09:50 IST

लोणावळ्याजवळ खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अप लाईनवर दरड कोसळली आहे. यामुळे अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनवर वळविली आहे.

landslide on pune-mumbai railway track mumbai bound traffic affected
खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली
  • पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत
  • अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनवर वळविली

लोणावळ्याजवळ खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अप लाईनवर दरड कोसळली आहे. यामुळे अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनवर वळविली आहे. अप लाईनची वाहतूक सुरळीत होण्यास काही तास लागण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्ग आणि आसपास पडलेला दगड मातीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू केले आहे. ( landslide on pune-mumbai railway track mumbai bound traffic affected )

मंकीहील ते ठाकुरवाडी दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अप लाईनची वाहतूक मिडल लाईनवर वळविली आहे. अप लाईनची वाहतूक सुरळीत होण्यास काही तास लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

पावसाविषयी हवामान खात्याचा अंदाज जाहीर

  1. पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ४ दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट
  2. नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या २४ तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता
  3. कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता तसेच विदर्भात काही जिल्ह्यात पावसाची शक्यता
  4. विदर्भाला १४ ऑगस्ट पासून ऑरेंज अलर्ट. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा दमदार पावसाचा अंदाज.
  5. मुंबईत वांद्रे खाडी परिसरात बुडालेल्या दोघांचा शोध सुरू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी