Lonavla Municipal Council : भाजपची हवा निघणार; पुण्यातील 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर

पुणे
भरत जाधव
Updated Jan 12, 2022 | 09:24 IST

Lonavla Municipal Council : उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका (Elections) आणि राज्यातील महागनगरपालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुकीआधी भाजपची (BJP) हवा गुल होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) प्रवेश केला तर काहींनी समाजवादी पक्षाची साथ पकडली.

 18 Corporators likely join to  Sharad Pawar's NCP Party
पुण्यात भाजपमध्ये खिंडार, 18 नगरसेवकांना एनसीपीचा लळा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि अपक्षांचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल होणार
  • पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटच्या सभेवर नगरसेवक बहिष्कार टाकणार
  • सुरेखा जाधव आणि पक्षाचे पदाधिकारी नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत.

Lonavla Municipal Council Corporator : पुणे : उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका (Elections) आणि राज्यातील महागनगरपालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुकीआधी भाजपची (BJP) हवा गुल होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) प्रवेश केला तर काहींनी समाजवादी पक्षाची साथ पकडली. आता पुण्यातील लोणावळा (Lonavla) नगरपरिषदेत (Municipal Council) देखील भाजपला खिंडार पडणार आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मनमानी कारभारामुळे वैतागलेले 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे वृत्त एका स्थानिक वृत्तसंस्थेने दिले आहे.  

भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि अपक्षांचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याची चर्चा सध्या लोणावळ्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासोबतही या 18 नगरसेवकांनी गुप्त बैठक घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याविषयी लोणावळा नगरपालिकेच्या नाराज झालेल्या नगरसेवकांनी एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव लोणावळा शहराच्या विकास कामात स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. कदाचित त्यांचा स्थानिक नगरसेवकांवर विश्वास नाही. लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे. निवासी भागात बांधकामे, केबल टाकणे याबाबत नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. मात्र, 4 जानेवारीला झालेल्या सर्वसाधारण सभा आणि 10 जानेवारीला झालेली विशेष सभा नगरसेवकांनी रद्द केली. पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटच्या सभेवर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.

भाजप नगरसेविका अपर्णा बुटाला म्हणाल्या की, सुरेखा जाधव आणि पक्षाचे पदाधिकारी आम्हाला विश्वासात घेत नाहीत. आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे नगराध्यक्षा जाधव यांच्यावर नाराज असल्याने नगरसेवक नाराज आहेत. तर ‘विकासाच्या कामात आम्ही सहकार्य करु पण चुकींच्या कामांना आम्ही साथ देणार नसल्याची खंत काँग्रेसच्या नगरसेविका आरोही तळेगावकर यांनी व्यक्त केली.आमदार सुनील शेळके यांनीही यासंदर्भात नगरसेवकांना दिलासा दिला आहे. लोणावळा शहरातील विकास कामात चुकीची कामे होत असल्याची माहिती त्यांनी दिली. चुकीच्या कामाला पाठीशी घालणार नाही असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी