मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात निवासी इमारतीतल्या फ्लॅटमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट

पुणे
रोहन जुवेकर
Updated Jun 13, 2022 | 01:16 IST

low intensity blast in a flat in a residential building in Pune before Modi visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याआधी १२ जून २०२२ रोजी पुण्यातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट झाला.

low intensity blast in a flat in a residential building in Pune before Modi visit
मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात निवासी इमारतीतल्या फ्लॅटमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात निवासी इमारतीतल्या फ्लॅटमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर
  • दौऱ्याआधी १२ जून २०२२ रोजी पुण्यातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट

low intensity blast in a flat in a residential building in Pune before Modi visit : पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याआधी १२ जून २०२२ रोजी पुण्यातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट झाला. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी इंजिनिअर असलेल्या राशीद शेख याला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार १४ जून २०२२ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या निवासस्थानाला भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. या दौऱ्याआधी पुण्यात कमी तीव्रतेचा स्फोट झाला. याआधी जानेवारी २०२२ मध्ये पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असताना पंतप्रधान मोदी पंजाब दौऱ्यावर गेले होते. यावेळी काही आंदोलकांनी रस्ता अडवला होता. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर सुमारे पंधरा ते वीस मिनिटे अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधानांचा पुढील कार्यक्रम रद्द करून त्यांना कडेकोट बंदोबस्तात तातडीने राजधानी दिल्लीला नेण्याची व्यवस्था सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली. या पार्श्वभूमीवर पुण्यात पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी झालेल्या स्फोटाकडे गंभीरपणे बघितले जात आहे.

पुण्यातील भवानी पेठ येथील निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट झाला. स्फोटामुळे इमारतीला हादरा बसला आणि ज्या घरात स्फोट झाला तिथे फुटलेल्या काचांचा खच पडला. याआधी ९ जून २०२२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे एका रस्त्यावर कमी तीव्रतेचा बॉम्ब आढळला होता. पोलिसांनी तपासाअंती या प्रकरणात रामेश्वर मोकासे नावाच्या व्यक्तीला अटक केली. आर्थिक वादातून रामेश्वर मोकासेने दिनेश राजगुरूच्या दुकानासमोर कमी तीव्रतेचा बॉम्ब ठेवल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी