Bus Accident : पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा अपघात, 4 ठार

पुणे
रोहन जुवेकर
Updated Feb 01, 2023 | 10:10 IST

Luxury bus accident on Pune Solapur highway, 4 killed and 20 injured : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला नजीक वाखारी हद्दीत बस आणि ट्रक यांचा अपघात झाला. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 20 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले.

Luxury bus accident on Pune Solapur highway
पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा अपघात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा अपघात, 4 ठार
  • 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 20 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले
  • मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Luxury bus accident on Pune Solapur highway, 4 killed and 20 injured : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला नजीक वाखारी हद्दीत बस आणि ट्रक यांचा अपघात झाला. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 20 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

लक्झरी बस सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. चौफुला ओलांडल्यानंतर वाखारी हद्दीत एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक महामार्गावर थांबला होता. सोलापूरहून पुण्याला जात असलेल्या लक्झरी बसच्या ड्रायव्हरला ट्रकचा अंदाज आला नाही. यामुळे लक्झरी बस थांबलेल्या ट्रकला धडकली. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची जोरदार धडक बसली. या अपघातात बसच्या एका बाजूचा चुराडा झाला. 

बसने ट्रकला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 20 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना यवत आणि केडगावमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. काही गंभीर जखमींना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी यवत पोलीस पुढील तपास करत आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये ED ची मोठी कारवाई; धाड चालू असतानाच बँकेच्या माजी अध्यक्षाने नष्ट केला पुरावा

Pune murder Mystry: एकाच कुटुंबातील 7 जणांच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं, नेमकं काय घडलं? वाचा INSIDE STORY

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी