Pune: पुण्यात अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, भाजप नेते होते निशाण्यावर

पुण्यात अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याच्या चौकशीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुण्यातून अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांचा कट उघड 
  • जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्लीसह उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत होते
  • चौकशीत धक्कादायक माहिती झाली उघड

Maharashtra News: रायगड जिल्ह्यात संशयास्पद बोटीवर शस्त्रास्त्रे आढळून आले आणि त्यानंतर मुंबई पोलिसांना धमकीचा आलेला मेसेज या घटनांमुळे राज्यात पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे. त्याच दरम्यान आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएस (Maharashtra Anti Terrorist Squad)ने काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक संशयित दहशतवाद्याला अटक केली होती. या संशयित दहशतवाद्याचे नाव जुनैद मोहम्मद (Juanid Mohammad) असे होते. त्याच्या चौकशीत एक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे.

संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्लीसह उत्तरप्रदेशात हल्ला करण्याच्या तयारीत होते. तशाप्रकारे त्यांच्याकडून प्लॅन आखण्यात येत होता अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. इतकेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या रॅलीवर ते हल्ला सुद्धा करण्याचं प्लॅनिंग करत होते. 

अधिक वाचा : Suspicious boat in Raigad: हरिहरेश्वरमध्ये सापडलेल्या बोटीचं ओमान कनेक्शन? मोठी माहिती आली समोर

मिळालेल्या माहितीनुसार, हे संशयित दहशतवादी नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य, जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी या तिघांवर हल्ला करण्याचा कट रचत होते. या हल्ल्यासाठी त्यांना मिळणारा पैसा आणि इतर साहित्य हे पाकिस्तानातील हँडलर्स पुरवणार होते असंही तपासात समोर आले आहे.

अधिक वाचा : रायगडमध्ये दोन संशयास्पद बोट आढळल्या; बोटीत शस्त्रसाठा असल्याने खळबळ, संपूर्ण जिल्ह्यात हाय अलर्ट

जुनैद मोहम्मद याला २४ मे रोजी पुण्यातील दापोडी परिसरातून अटक केली होती. त्यावेळी अशी माहिती समोर आली होती की, काश्मीरमधील दहशतवादी संघटना या घातपात आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी जुनैदला पैसा पुरवत होते. जुनैद हा वेगवेगळ्या बनावट सोशल मीडिया प्रोफाईल्स तयार करुन आपल्या दहशतवादी सहकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचंही तपासात समोर आलं आहे.

जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी हे उत्तरप्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहेत. त्यांनी सनातन धर्मात प्रवेश केला आहे. नरसिंहानंद सरस्वती हे गाझियाबादमधील शिवशक्ती धामचे महंत आहेत. तर संदीप आचार्य हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्टार प्रचारक आणि गायक असल्याचं म्हटलं जातं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी