Shivshahir Babasaheb Purandare passed away: महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे
भरत जाधव
Updated Nov 15, 2021 | 14:03 IST

Shivshahir Babasaheb Purandare passed away:मराठी साहित्यिक(Marathi litterateur), नाटककार, इतिहासकार (Historian) म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचे आज पुण्यात (Pune) वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते.

Awardee Shivshahir Babasaheb Purandare was cremated
शिवशाहीर पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बाबासाहेब पुरंदरेंना वीस दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • पुरंदरे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पर्वती येथील वाड्यावर प्रचंड गर्दी झाली होती.
  • 2019 मध्ये त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता.

Shivshahir Babasaheb Purandare passed away: पुणे : मराठी साहित्यिक(Marathi litterateur), नाटककार, इतिहासकार (Historian) म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचे आज पुण्यात (Pune) वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. तोल जाऊन घरात पडल्याने त्यांना डोक्याला दुखापत झाली होती. बाबासाहेबांना वीस दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाल्याने प्रकृतीची गुंतागुंत वाढली होती. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  

 दरम्यान बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरिक्षक यावेळी उपस्थित आहेत. पोलिसांकडून बाबासाहेब पुरंदरेंना अखेरची मानवंदना देण्यात आली.  पुरंदरे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पर्वती येथील वाड्यावर प्रचंड गर्दी झाली आहे. शिवशाहीरांचे अंतिम दर्शन घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिक पर्वतीकडे धाव घेत दर्शनासाठी गर्दी केली होती. 

राज ठाकरेंनी घेतले अंतिम दर्शन

राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले. बाबासाहेब पुरंदरेंचे निधन झाल्याची बातमी कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून पुण्याकडे येण्यासाठी रवाना झाले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आहे. बाबासाहेबांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी, काम, लिखाण, साहित्य अनेक पिढ्यांसाठी जिवंत राहिल अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली

बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांचे जीवन इतिहास आणि संशोधनासाठी समर्पित केले होते. 2019 मध्ये त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, आणि 2015 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी