महाराष्ट्रातील भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक; ऑनलाईन माध्यमातून गंडा, तुम्हालाही आलाय का असा कॉल?

Maharashtra BJP: महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील भाजप आमदारांची आर्थिक फसवणूक
  • ऑनलाईन माध्यमातून महिला आमदारांची झाली फसवणूक 
  • पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

पुणे : महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भाजपच्याच महिला आमदारांची आर्थिक फसवणूक (Man cheated with BJP women MLA's) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकूण चार महिला आमदारांची फसवणूक झाली असून त्या प्रकरणी पुण्यातील (Pune) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

कुठल्या आमदारांची झाली फसवणूक? 

भाजपच्या आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale), आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) आणि आमदार मेघना बोर्डीकर (MLA Meghana Boardikar) या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या चारही आमदारांनी एका व्यक्तीला आर्थिक मदत केली मात्र, तो व्यक्ती फ्रॉड असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर या प्रकरणी महिला आमदाराकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव मुकेश राठोड असल्याचं वृत्त आहे. मुकेश राठोड याने आपली आई आजारी असल्याचं सांगत महिला आमदारांकडे मदतीसाठी हात पसरले. मुकेश राठोड याने या चारही महिला आमदारांना फोन कॉल करुन त्यांच्याकडे आईच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी केली.

हे पण वाचा : मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर

त्यानंतर या महिला आमदारांनी मुकेश राठोड याच्या आईच्या उपचारासाठी त्याला ऑनलाईन माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले. आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, मुकेश राठोड नावाच्या व्यक्तीने आपल्याला कॉल करुन आईच्या उपचारासाठी पैसे मागितले होते. आपली आई पुण्यातील बाणेर येथील रुग्णालयात उपचार घेत असून आर्थिक मदतीची गरज असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यानुसार आमदार माधुरी मिसाळ यांनी मुकेशच्या बँक खात्यात गुगल पे द्वारे पैसे ट्रान्सफर केले.

त्यानंतर नंतर आपल्या पक्षातील इतर महिला आमदारांनाही अशाच प्रकारे मदतीसाठी फोन कॉल आल्याचं आमदार माधुरी मिसाळ यांच्या लक्षात आलं. मग, आमदार माधुरी मिसाळ यांनी या प्रकरणाबाबत पुणे पोलिसांत तक्रार केली. तसेच सायबर पोलिसांनाही पत्र लिहून घडलेला प्रकार कळवला आहे.

आमदार श्वेता महाले यांचं स्पष्टीकरण 

या फसवणुकीच्या वृत्तावर भाजप आमदार श्वेता महाले यांचं स्पष्टीकरण आलं आहे. त्यांनी सांगितले की, मलाही मदतीसाठी फोन आला होता. मात्र आपण कसलीही मदत केली नाही. संबंधित तरूणाची संपूर्ण शहानिशा करून हा खोट बोलत आहे याची माहिती घेतली होती, माझ्या मतदार संघातला असल्याचे त्याने खोटे सांगितलं. त्यामुळे याबाबत माझी कसलीही आर्थिक फसवणूक झाली नाही. अशा लोकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी