Mask Mandatory in Satara: कोरोनाबाधीत (Coronavirus) रुग्णसंख्येत पुन्हा एकदा दिवसागणिक वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात (Satara News) मास्कसक्ती लागू (Mask Mendatory) करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात सरकारी कार्यालये, बँका, शाळा- महाविद्यालयात मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे. त्याच बरोबर या पार्श्वभूमीवर राज्यभरात देखील उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Maharashtra Health Ministry) सचिवांनी दिल्या आहेत. त्यानुसार साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूपेश जयवंशी यांनी मास्क बंधनकारक करण्याचे आदेश काढले आहेत.
अधिक वाचा : Twitter Logo: ट्विटरची चिमणी उडाली फुरुर फूर...;
राज्यात एन्फ्लुएन्झाबरोबरच (H3N2) ोरोनानं (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढलं आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूपेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क बंधनकारक करण्याचे आदेश काढले आहे. शासकीय निमशासकीय कार्यालये, बँका तसेच शाळा-महाविद्यालयात मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर आठवडे बाजार, बसस्थानक परिसर, यात्रा, मेळावे, विवाह समारंभसारखे सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्क वापरवा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सॅनिटायझरचा वापर करावा, असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
अधिक वाचा : प्रियंकानं बॉलिवूडमध्ये काम केलं, नाव केलं, मग आता टीका का?
संपूर्ण राज्यात येत्या 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मं राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परीक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय. राज्यात तूर्तास मास्कसक्ती नाही, मात्र नागरिकांनी खबरदारी म्हणून मास्क वापरावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. दुसरीकडे, राज्यात कोविड रूग्णालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लसींचा देखील पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.
अधिक वाचा : साईबाबा देव नाहीत, फकीर ! बागेश्वर बाबाचं वादग्रस्त वक्तव्य
देशात दररोज 3000 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये दिवसाकाठी 500 हून अधिक रुग्ण आढळून येत आहे. त्याचबरोबर देशभरातील अनेक राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. हरियाणासह तमिळनाडू सरकारने देखील मास्कसक्तीचा निर्णय घेतला आहे. सतर्क राहा पण घाबरुन जाऊ नका, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे.
अधिक वाचा : कधी आहे चैत्र पोर्णिमा 5 एप्रिलला की 6 ला?
देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध आयटी कंपन्यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉर्म होमचा पर्याय ठेवला आहे. काही कंपन्यांमध्ये मास्कसक्ती देखील करण्यात आली आहे.