Pune Crime: धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, घटनेने खळबळ

Minor girl raped in running train: धावत्या ट्रेनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • १४ वर्षीय मुलीवर धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार
  • पोलिसांनी तीन आरोपींना ठोकल्या बेड्या 
  • पीडित मुलीकडे ट्रेनचं तिकीट नव्हतं आणि त्याआधारे आरोपींना तिला धमकावत केला बलात्कार

Girl raped in running train: धावत्या ट्रेनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (minor girl raped in running train) झाल्याची घटना समोर आली आहे. भोपाळ ते पुणे प्रवासा दरम्यान झेलम एक्सप्रेसमध्ये १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आहे. १९ जुलै रोजी ही घटना घडली, जेव्हा एक अनाथ अल्पवयीन मुलगी भोपाळहून ट्रेनच्या एसी डब्ब्यातून प्रवेश करत होती. (Maharashtra crime news minor girl abused in running train during bhopal pune travel)

ट्रेनमधील पॅन्ट्री कारमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने या मुलीला पकडलं आणि एसी डब्ब्यातून प्रवास करण्याबाबत तिला विचारणा करु लागला. या मुलीकडे तिकीट नसल्याचं पाहून त्याने तिला घाबरवलं आणि मग धमकावत पॅन्ट्री कारमध्ये तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी भुसावळ रेल्वे स्थानकात उतरली आणि रेल्वे स्थानकात बसून रडू लागली. त्यावेळी एका एनजीओच्या सदस्याने मुलीला पाहून तिची विचारणा केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

अधिक वाचा : Mumbai Crime: महिलांकडून पैसे आणि दागिने चोरणारी सिनियर सिटीझन गँग गजाआड

या घटनेची माहिती भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण भोपाळ रेल्वे पोलिसांकडे ट्रान्सफर करण्यात आलं कारण, अल्पवयीन असलेल्या मुलीवर ज्यावेळी अत्याचार झाला तेव्हा ट्रेन भोपाळ रेल्वे पोलिसांच्या हद्दीत होती.

अधिक वाचा : Story of Father : पॅरोलवर सुटलेल्या बाबाची कहाणी! लेकींसाठी 12 वर्षे पोलिसांना चकवा, थक्क करणारी कथा

भोपाळ रेल्वे पोलिसांनी पुणे रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार कळवला आणि आरोपीबाबतही माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या टीमने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले होते की, आरोपीने 'ए २ झेड हाऊसकिपिंग' चा शर्ट परिधान केला होता. ट्रेन आधीच पुण्यात पोहोचली होती. जेव्हा पुणे पोलिसांना भोपाळमधून माहिती मिळाली त्यानंतर लगेचच पुणे पोलिसांनी संपूर्ण रेल्वे परिसराला घेरलं. त्यानंतर जवळपास १३ संशयितांना ताब्यात घेतलं.

पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आणि याबाबत भोपाळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पीडित मुलीने सुद्धा मुख्य आरोपीची ओळख पटवली आणि त्यानंतर इतरही दोघांनाही हा प्रकार माहिती होता असं सांगितलं. आरोपींचा कुठलाही फोटो नसताना केवळ माहितीच्या आधारावर पुणे रेल्वे पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना २० जुलै रोजी भोपाळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी