पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर; 2000 कोटींची गुंतवणूक येणार, 5000 रोजगार मिळणार

Electronic Manufacturing Cluster in Maharashtra: महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर झाला आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुणे जिल्ह्यातील रांजणगावमध्ये होणार इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर
  • 2000 कोटींची गुंतवणूक येणार, 5000 रोजगार निर्मिती होणार - देवेंद्र फडणवीस

Electronic Manufacturing Cluster in Pune: महाराष्ट्रातून एक-एक प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात असल्याने जोरदार टीका होत आहे. मात्र, त्याच दरम्यान आता एक चांगली बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर झाल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या योजनेमुळे तब्बल 2000 कोटींची गुंतवणूक येणार असून पाच हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. (Maharashtra gets electronic manufacturing cluster 2000 crore investment with 5000 jobs in pune ranjangaon maharashtra)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, केंद्र सरकारने  महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी घोषणा केलीय की महाराष्ट्राला यापुढे इलेक्ट्रॉनिक हब म्हणून विकसित करतील. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की, भविष्य हे इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. सर्वाधिक गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही एक भेटच आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणा अंतर्गत राज्याला दिलेली ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली ही एक भेट आहे. या प्रकल्पामुळे 2000 कोटींची गुंतवणूक येणार आहे आणि त्यासोबतच 5000 रोजगारांची निर्मिती होणार आहे.

हे पण वाचा : ​12 राशींपैकी सर्वाधिक यशस्वी रास कोणती?

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, टाटा एअरबस प्रकल्प 2021 मध्ये गुजरातमध्ये नियोजित झालेला. पण याचं खापर आमच्यावर फोडण्यात आलं. राज्याचा विरोधी पक्षनेता असताना मी टाटा यांच्याशी संबंधित व्यक्तीला माझ्या घरी बोलावलं. मात्र, त्यांनी सांगितले की, त्यावेळी राज्यातील वातावरण उचित नाहीये.

हे पण वाचा : 12 राशींपैकी सर्वाधिक धोकादायक रास कोणती? वाचा

मी एमआयडीसीला कळवले की तुम्ही पाठपुरावा करा. हा प्रकल्प गेल्यावर सुद्धा मी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले की, आम्ही वर्षभरापूर्वीच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा निर्णय उद्धव ठाकरेंना कळवला आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी