VIDEO: ...म्हणून फडणवीसांना गृहखात्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नसेल: गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे
Updated Jan 06, 2020 | 20:50 IST | अजहर शेख

शरद पवारांनी गृह खात्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली असून ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडेन. गृहखात माझ्यासाठी नवीन आहे,खात्यातील जेष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून निर्णय घेईल असं अनिल देशमुखांनी म्हटल

maharashtra home ministry anil deshmukh ex cm devendra fadnavis baramati ncp bjp marathi news google
VIDEO: ...म्हणून फडणवीसांना गृहखात्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नसेल: गृहमंत्री अनिल देशमुख 

बारामती: उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप करण्यात आलं आहे. खातेवाटपात गृहखाते राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असून पवारांचे निकटवर्ती असणारे अनिल देशमुख यांच्याकडे गृहखात्याची कमांड दिली गेली आहे. गृह खात्याचा कारभार सुरु करण्या अगोदर अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बारामती येथे येऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांना गृहखात्याकडे लक्ष देता आलं नसेल त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात आणि नागपूर येथे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. मात्र आता तसं होणार नाही नागपूर सह सर्व महाराष्ट्रात गुन्हेगारी वर नियंत्रण ठेवले जाईल आणि कायदा सुव्यवस्था देखील राखण्यासाठी चांगली पाऊलं उचलू असं विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृह खात्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली असून ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडेन. गृहखात माझ्यासाठी नवीन आहे तरीही खात्यातील जेष्ठ अधिकाऱ्यांशी आठ तारखेला सविस्तर चर्चा करून पुढील काम सुरु करु असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील युवक पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत आजपर्यंत पोलीस भरती विषयी काय अडथळे आले आहेत ते सर्व तपासून अडथळे दूर करण्यात येतील असंही गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. १९९९ मध्ये अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अनिल देशमुख यांना गृहखात्याची जबाबदारी देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे. विदर्भात गृह खाते देत तेथे पक्षाला अधिक बळकटी देण्याचा यामागचा उद्देश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी