MH 12th Result 2021: मोठी बातमी, 'या' दिवशी लागणार बारावीचा निकाल? बघा निकालाबाबतची मोठी अपडेट

पुणे
प्रशांत जाधव
Updated Jul 19, 2021 | 13:49 IST

Maharashtra HSC Result 2021 ।। बारावीचा निकाल येत्या काही दिवसातच लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

maharashtra hsc result 2021 date time hsc result to be announced in july
मोठी बातमी, 'या' दिवशी लागणार बारावीचा निकाल  

थोडं पण कामाचं

  • राज्याच्या शालेय शिक्षण मंडळ  दहावीनंतर आता बारावीचा निकाल कधी लावणार याकडे लक्ष लागले आहे.
  • राज्याच्या शिक्षण मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यातच बारावीचा निकाल (MH HSC result 2021)  जाहीर होणार आहे.
  • यापूर्वी ४ ऑगस्टपर्यंत हा निकाल लागू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.  

Maharashtra HSC Result  2021 । पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण मंडळ  दहावीनंतर आता बारावीचा निकाल कधी लावणार याकडे लक्ष लागले आहे. (Maharashtra 12th result date)राज्याच्या शिक्षण मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यातच बारावीचा निकाल (MH HSC result 2021)  जाहीर होणार आहे.  हा निकाल येत्या काही दिवसातच लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (maharashtra hsc result 2021-date time hsc result to be announced in july )

महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल (MH HSC result 2021 date) येत्या 21 जुलैला लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी निकालाची तारीख ऑगस्ट महिन्याची होती. यापूर्वी ४ ऑगस्टपर्यंत हा निकाल लागू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.  यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona) दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागत आहे. बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा  निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात  आला होता. मात्र अखेर बारावीची परीक्षा (HSC Exam) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसेच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा(intranal) , असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

दहावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघताना ओव्हरलोड झाल्यामुळे साईट क्रॅश झाली होती. ही  अडचण बघता बारावीच्या निकालाच्या दिवशी अशी कोणतीही तांत्रिक अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. बारावीच्या निकालाबाबत शिक्षण मंडळाकडून अजूनही अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. पण जर २१ तारखेला जर निकाल जाहीर होणार असेल तर उद्या दुपारपर्यंत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी