'हे अगदी चुकीचे झाले', एमपीएससी परीक्षेसंदर्भात पंकजा मुंडेंनी शेअर केला व्हिडिओ

पुणे
अजहर शेख
Updated Mar 11, 2021 | 16:55 IST

Maharashtra MPSC exam postponed:राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण आहे.पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विद्यार्थ्यांनी ऐकल नाही

Maharashtra MPSC exam postponed
एमपीएससी परीक्षेसंदर्भात पंकजा मुंडेंनी शेअर केला व्हिडीओ   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सरकारचं नियोजन चुकलं: प्रविण दरेकर
  • एमपीएससी परीक्षेमध्ये राजकारण करु नका - गोपीचंद पडळकर
  • भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात सहभागी झाले

पुणे : १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले असून, पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.  दरम्यान, विध्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विध्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. दरम्यान, यावर भप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत एमपीएससीच्या परीक्षा सरकारने रद्द केल्या आहेत हे अगदी चुकीचे झाले आहे असं म्हंटल आहे.  

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, एमपीएससीच्या परीक्षा सरकारने रद्द आहेत हे अगदी चुकीचे आहे. एमपीएससीची तयारी करणारी मुलगा किंवा मुलगी हे शहरात अत्यंत हलाखीच्या परस्थितीत राहत असतात. अभ्यासीका जॉईन करून रात्रांदिवस आभ्यास करतात. अचानकपणे परीक्षा रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे असं मला वाटत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. सर्व व्यवहार आणि व्यवसाय हे कोरोनाच्या अख्याधारित राहून चालू आहेत, मग एमपीएससीची परीक्षा का नाही असा सवाल देखील मुंडे यांनी उपस्थित केला आहे. परीक्षा रद्द केल्यान अनेक मुलाचं नुकसान होईल, त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण होईल. हा निर्ण्याबाद्द्ल मी तीव्र नापसंती व्यक्त करत असलायचं देखील मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात सहभागी झाले

राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विद्यार्थ्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कळवण्यात आले आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

एमपीएससी परीक्षेमध्ये राजकारण करु नका, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. हे गोंधळलेले सरकार आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.यूपीएससी ते सीईटीच्या परीक्षा होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतात. १४ तारखेलाचं होणारी परीक्षा झाली पाहिजे.

सरकारचं नियोजन चुकलं: प्रविण दरेकर

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे की, सरकारनं नियोजन करायला पाहिजे. राज्य शासनाचं नियोजन चुकलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं. मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न होतोय. विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र थांबला नाही, थांबनार नाही हे सांगून चालणार नाही त्यावर मार्ग काढा, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी