महाराष्ट्रात पावसाचे थैमान: पुणे विभागात मुसळधार पावसाचा तडाखा, ८४,००० पेक्षा अधिक नागरिकांना हलवले

पुणे
विजय तावडे
Updated Jul 24, 2021 | 17:42 IST

जोरदार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) पुणे विभागातील ८४,४५२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरीमध्येही परिस्थिती गंभीर.

Maharashtra Heavy Rainfall
महाराष्ट्राला पावसाचा जोरदार तडाखा 

थोडं पण कामाचं

  • जोरदार पावसामुळे महाराष्ट्राच्या विविध भागातील जनजीवन विस्कळीत, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोरदार फटका
  • महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय तुकडीसह सैन्याच्या तुकड्या, पणे विभागात हजारोंना सुरक्षित स्थळी हलवले
  • कोल्हापूरात पंचगंगा धोक्याच्या पातळीच्या वर

पुणे : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसाने (Maharashtra Heavy rainfall) जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील ४८ तासात पावसाचा फटका बसल्याच्या अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीलादेखील त्याचा फटका बसून रेल्वे वाहतूक (railways have been disrupted) कोलमडली आहे. जोरदार पावसाचा तडाखा बसल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) पुणे विभागातील ८४,४५२ नागरिकांना (thousands of citizens shifted to safer places in Pune division) सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur affected by heavy rainfall) ४०,००० नागरिकांचादेखील समावेश आहे. पुणे विभागात जोरदार पाऊस झाल्यामुळे आणि अनेक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हे पाऊल उचलल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. २०१९ मध्ये आलेल्या पुराच्या वेळेस होती त्यापेक्षा अधिक वरील पातळीवरून कोल्हापूरजवळील पंचगंगा नदी सध्या वाहते आहे. राजगड जिल्ह्यात(Raigad District) दरड कोसळून ४४ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखाली २५ पेक्षा जास्त नागरिक अडकल्याची माहिती जिल्ह्याच्या कलेक्टर निधी चौधरी यांनी दिली होती. (Maharashtra Heavy Rainfall affects many parts, thousands of citizens shifted to safer places in Pune division & western Maharashtra) 

रायगड जिल्ह्यात दरड कोसळून आतापर्यंत ४४ मृत्यू

भारतीय नौदलाचे पूरग्रस्त भागातील मदतकार्य

स्थानिक प्रशासनाकडून मदतीची विनंती करण्यात आल्यानंतर मुंबईतून नौदलाच्या एकूण सात तुकड्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईतून एक सीकिंग ४२ सी हेलिकॉप्टरदेखील हवाई मदतीसाठी रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर गोव्यातूनदेखील रत्नागिरीतील मदतकार्यासाठी एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. मुंबईत आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अतिरिक्त पूरग्रस्त मदतकार्य तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तर रायगड जिल्ह्यात तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत ५० जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

कोल्हापूरात पंचगंगा धोक्याच्या पातळीच्या वर

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात नदीच्या पुरात एक बस वाहून जाण्याआधीच त्यातून प्रवास करणाऱ्या अकरा जणांना वाचवण्यात आले आहे. यामध्ये ८ नेपाळी मजूर होते. 'कोल्हापूरात राजाराम पुलाखाली पाण्याची पातळी ५४ फूटांवर पोचली आहे. मदतकार्य करणाऱ्या तुकड्यांना सहकार्य करण्याची मी विनंती करतो. पुढील ४८ तास हे महत्त्वाचे असून लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे,' असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय तुकडीसह सैन्याच्या तुकड्या

महाराष्ट्रात सध्या होत असलेल्या अभूतपूर्व पावसामुळे विविध नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदतीची विनंती करण्यात आल्यानंतर भारतीय सैन्याने मदतकार्यासाठी आपल्या तुकड्या पुरग्रस्त भागात हलवल्या आहेत. पुण्यातील औंध सैन्य छावणी आणि बॉम्बे इंजिनियर ग्रुपमधून एकूण १५ मदत आणि बचाव तुकड्या रत्नागिरी, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात लगेचच पाठवण्यात आल्या आहेत. सैन्याची मदत आणि बचाव पथके स्थानिक प्रशासनाला पाण्याखाली गेलेल्या भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. सैन्याच्या दक्षिण विभागाचे जीओसी-ई-सी लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी म्हटले आहे की भारतीय सैन्यदल अशा कठीण प्रसंगांत जनतेबरोबर उभे आहे आणि पूरग्रस्त भागाला आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल. सैन्याच्या मदत आणि बचाव पथकांमध्ये इंजिनियर्सच्या पथकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर वैद्यकीय पथकसुद्धा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आहे. आवश्यक तिथे प्रथमोपचार आणि औषधे पुरवण्याचे काम या पथकांकडून केले जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी