पुणे : देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. नुकतीच पुण्यातील हिंजेवाडी येथे एका महिलेवर एका आयटी व्यावसिकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय आयटी व्यावसायिकाने ज्यनिअर महिला सहकाऱ्याला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला आहे. आरोपीने महिलेला जेवण्यासाठी बोलवल्यानंतर तिला दारू पिण्यास भाग पाडले नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेचा व्हिडिओ बनवत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपीने पीडितेला 6 जून रोजी परत आपल्या घरी बोलवलं आणि तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर परत लैंगिक अत्याचार केला.
नंतर आरोपी वारंवार तिला कॉल करत होता. जेव्हा त्या व्यक्तीने पीडितेला पुन्हा कॉल केला तेव्हा महिलेने पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या गुन्ह्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर कलम 375 (बलात्कार) आणि 327 (विषाद्वारे दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील आणखी एका घटनेत एका व्यक्तीने फायनान्शियल सोल्युशन कंपनीत काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यावर बलात्कार केला. कनिष्ठावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नंतर अटक केली. दिल्लीतील अशाच एका घटनेत मार्चमध्ये नैऋत्य दिल्लीतील हुमायुपूर भागात एका व्यक्तीने आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना 16 मार्च रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु पीडितेने 18 मार्च रोजी पोलिसात तक्रार नोंदवली. नंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, तिच्या सहकाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.