Maharashtra Weather Update: पावसामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

पुणे
प्रशांत जाधव
Updated Oct 15, 2020 | 13:41 IST

Maharashtra Weather Update: पुणे जिल्ह्यात  काल झालेल्या संततधार पावसाचा फटका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतिम वर्षाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या

maharashtra savitribai phule pune university
पावसामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या 

थोडं पण कामाचं

  • पुणे जिल्ह्यात  काल झालेल्या संततधार पावसाचा फटका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतिम वर्षाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या
  • पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे पुणे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.
  • पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. अगोदरच कोरोना संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

Rains Update Pune, पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) परीक्षा स्थगित (Exam Postpone) केल्या असून  पुढील काळात या परीक्षा घेण्यात येणार आहे.  पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे पुणे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याला काल संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र जोरदार पावसाने झोडपले . आज सकाळीही पुण्यात पावसाने जोर कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचणी निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी विद्यापीठाने आजच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. अगोदरच कोरोना संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे परीक्षांना विलंब झाला आहे. विलंबाने का होईना परीक्षा पार पडत होत्या. पण जोरदार पावसाने गेल्या दोन दिवसापासून अडचण निर्माण केली. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस कोसळत आहे. अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

काही ठिकाणी अद्यापही पूरस्थीती कायम आहे. विविध भागांमध्ये विद्यूत पूरवठा खंडीत झाला आहे. हळूहळू हा विद्यूत पूरवठा सुरळीत होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावायचे म्हणजे त्यांना मनस्ताप देण्याचा प्रकार ठरेल. त्यामुळे विद्यापीठाने आजच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आजच्या परीक्षांबाबतचे नवे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. विद्यार्थ्यांनी काळजी करुन नये असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाची बॅटींग सुरु आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे शहरांतील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि ग्रामीण भागातील विद्यूतपुरवठाही बराच काळ खंडीत झाला आहे. गेले काही दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

बारामती: पुण्याजवळील बारामतीत देखील तुफान पाऊस पडल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी बारामतीमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसंच यामुळे शेतीचं देखील बरंच नुकसान झालं आहे. 

सातारा: सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस बरसत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याता आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी