Maharashtra Weather Forecast: पुढील चार दिवस, या भागात मुसळधार पावसाची शक्यता 

पुणे
प्रशांत जाधव
Updated Oct 19, 2020 | 16:01 IST

 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

maharashtra weather forecast thunderstorm
पुढील चार दिवस, या भागात मुसळधार पावसाची शक्यता  

थोडं पण कामाचं

  •  कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
  • हवामान खात्याने येत्या  पाच ते सहा दिवस राज्यात काही ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
  • गालच्या उपसागराच्या पश्चिम भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra weather forecast and warning: पुणे :  कोकण,(Konkan) मध्य महाराष्ट्र  (Central Maharashtra)आणि मराठवाड्यात  (Marathwada)आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.(Thunderstorm activity expected over parts of Madhya Maharashtra and Marathwada during next 4 to 5 days) 

हवामान खात्याने येत्या  पाच ते सहा दिवस राज्यात काही ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.  कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यातच बंगाल उपसागराचा पश्चिममध्य भाग आणि आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झालीआहे. त्या परिणामी राज्यातील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पाऊस वाढणार आहे. 

पुढील हवामानाचा अंदाज

  1. १९ ऑक्टोबर : मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  ठाणे,  पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 
  2. २० ऑक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 
  3. २१ ऑक्टोबर : बुधवारी  जळगाव, परभणी हिंगोली वगळता राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  4. २२ ऑक्टोबर :   गुरूवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Image

Image


हवामान खात्याने दिलेला इशारा

  1. १९ ऑक्टोबर : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  
  2. २० ऑक्टोबर : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
  3. २१ ऑक्टोबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी