Ramdas Athawale : पुणे : सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नाहिये, तोपर्यंत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच १ जानेवारी रोजी दलित बांधवांनी भीमा कोरेगाव येथे फार गर्दी करू नका घरूनच अभिवादन करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. पुण्यात आठवले यांनी पत्रकारपरिषद घेतली तेव्हा ते बोलत होते. (make devendra fadnavis cm till uddhav thackeray recover says union minister ramdas athawale)
सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही. उद्धव ठाकरे आमचे आजही चांगले मित्र असल्याचे रामदास आठवले म्हणाले. उद्धव ठाकरे यांची प्रकृती लवकरात लवकरात बरी व्हावी, त्यांना बरे व्हायला अजून २-३ महिन्यांचा कालावधी लागेल तो पर्यंत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
१ जानेवारी रोजी भीमा कोरेगावला दलित बांधवांनी फार गर्दी करू नये असे आवाहन आठवले यांनी केले आहे. तसेच घरूनच अभिवादन करावे असेही आठवले म्हणाले.
कोरोना काळात रामदास आठवले यांनी गो कोरोना गो असा नारा दिला होता. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आला आहे, यावर नवीन नारा आहे का असा सवाल उपस्थित पत्रकारांनी त्यांना विचारला तेव्हा आठवले यांनी सध्या आपण गो महाविकास आघाडी गो असा नारा दिला आहे असे म्हटले.
आठवलेंचा नवा नारा, गो महाविकास आघाडी गो #ramdasathawale #mvagovernment pic.twitter.com/HB6POtxHkx
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) December 27, 2021