found dead body in room महिला आणि पुरुषाचा एका बंद खोलीत आढळले मृतदेह, मृत महिला नेपाळची असल्याची प्राथमिक माहिती

man and woman found dead body in room : एका घरामध्ये एका पुरूषासह महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. दोघांचे मृतदेह बंद खोलीत आढळून आल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

man and woman found dead body in room
महिला आणि पुरुषाचा एका बंद खोलीत आढळले मृतदेह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मयत महिला नेपाळची रहिवासी असल्याची माहिती
  • शरद यांच्यासोबत संपर्क होत नसल्याने त्यांच्या मित्राने शरद भुजबळ यांच्या घरी आला होता
  • घरातील गॅस सुद्धा सुरूच होता असे प्राथमिक चौकशीत समोर

found dead body in room पुणे  : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. २ दिवसांपूर्वीच आयएएस अधिकाराच्या घरात चोरीची घटना घडली होती. सदर , घटना ताजी असतानाच एका घरामध्ये एका पुरूषासह महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. दोघांचे मृतदेह बंद खोलीत आढळून आल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.  दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. पुण्यातील (Pune) मुंढवा परिसरातील केशवनगर (Keshav Nagar) येथील कुंभारवाडा (Kumbharwada) येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मयत महिला नेपाळची रहिवासी असल्याची माहिती

सुत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतकांमध्ये शरद भुजबळ वय वर्षे ४७ आणि हेमा नावाच्या ४३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. हेमा या नेपाळच्या रहिवासी असल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या दोघांचा अपघाती मृत्यू झाला आहे की, कोणी यांचा घातपात केला  आहे याबाबत आता विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, प्राथमिक अंदाज लावला असता   हा घातपात असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शरद यांच्यासोबत संपर्क होत नसल्याने त्यांच्या मित्राने शरद भुजबळ यांच्या घरी आला होता

शरद यांचा मित्र शरदला अनेक वेळा फोन करत होता. मात्र, शरदचा फोन लागत नसल्याने तो थेट  शरद भुजबळ यांच्या घरी आला असता त्याला मयत शरद भुजबळ आणि एका महिलेचा मृतदेह घरात आढळून आला. त्याननंतर त्याने घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. शरद भुजबळ हे एका ट्र्रव्हल्स कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. दरम्यान, शरद भुजबळ आणि हेमा या दोघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. 

घरातील गॅस सुद्धा सुरूच होता असे प्राथमिक चौकशीत समोर

पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. शरद यांच्या घरातील गॅस सुरूच होता. त्याचबरोबर शरद भुजबळ यांच्या घराच्या बाहेर केमिकलचा कॅन आढळून आला आहेत. असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहेत. त्यामुळे हा घातपात होता का? असा संशय येत आहे. दरम्यान, दोघांच्या शवविच्छेदनानंतर मृत्यू मागचं नेमकं कारण काय आहे हे समोर येईल. सदर घटनेचा पोलीस देखील बारकाईने तपास करत असून, या घटनेमागील सत्य देखील लवकरच बाहेर आणू असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी