kicked the private part of the minor girl : अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर नराधमाने मारली लाथ, पुण्याच्या घोरपडीतील धक्कादायक घटना

पुणे
Updated Nov 05, 2021 | 18:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

man kicked the private part of the minor girl : पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोक्सोसह (POCSO), विनयभंग (Molestation) आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

man kicked the private part of the minor girl
अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर नराधमाने मारली लाथ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोक्सोसह, विनयभंग , आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला
  • आरोपीने पीडित मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारून तिला जखमी केलं
  • पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्याला आहेत.

man kicked the private part of the minor girl : पुणे : राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याचे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.  गेली २ दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला असल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, सदर घटना ताजी असतानाचा पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

घराशेजारी राहणाऱ्या एका एका तरुणाने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील शब्दांत अपमानास्पद बोलून तिच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली असल्याचं समोर आलं असून, आरोपी युवकाने अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. आरोपीनं केलेल्या या अश्लील कृत्याची माहिती पीडीत मुलीच्या आईला मिळताच पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. आरोपी तरुण हा सराईत गुन्हेगार असून गुन्हा दाखल होताच, तो फरार झाला आहे. या घटनेचा पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहे. सदर घटना पुणे येथील घोरपडी परीसरात घडली आहे.

पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोक्सोसह, विनयभंग , आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला

पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोक्सोसह (POCSO), विनयभंग (Molestation) आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आदिल सुलतान शेख असं नराधम आरोपीचे नाव असून, त्याच वय २८  वर्षे आहे. तो पुण्यातील घोरपडी परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 

आरोपीने पीडित मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारून तिला जखमी केलं

आरोपीनं पीडितेला 'तेरे कपडे उतारके नंगा करूंगा' अशा शब्दात अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला आहे. नराधम आरोपी एवढ्या वरच थांबला नाही. तर त्याने पीडित मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारून तिला जखमी केलं आहे. दरम्यानं, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. पोलिसांनी पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करताच, आरोपी फरार झाला आहे. आरोपी आदिल हा सराईत गुन्हेगार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी