मराठा आरक्षण: संभाजीराजे म्हणाले, दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू; पण...

पुणे
भरत जाधव
Updated Aug 09, 2021 | 19:11 IST

मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भाजप खासदार छत्रपती संभाजीराजेंनी पुन्हा आक्रमक झाले आहेत. पु

Maratha Reservation Bjp Mp Chhatrapati Sambhajiraje
मराठा आरक्षण: संभाजीराजे म्हणाले, दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू; पण...  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मतभेद विसरुन लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आले.- खासदार छत्रपती संभाजीराजे
  • आपण ही लढाई संयमाने लढवत आहोत - संभाजीराजे
  • पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत टीकाकारांना जोरदार उत्तर

पुणे : मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भाजप खासदार छत्रपती संभाजीराजेंनी पुन्हा आक्रमक झाले आहेत. पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये त्यांनी आपल्या पुढील आंदोलनाचे ठिकाण सांगितलं शिवाय  तर्कवितर्क लढवणाऱ्यांनाही जोरदार टोला लगावला. आता पुढचं मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याचे संभाजीराजेंनी मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी जुलै महिन्यात कोल्हापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेटी घेतल्यानंतर तर्कवितर्क लढवणाऱ्यांनाही जबरदस्त उत्तर दिलं आहे. आपण ही लढाई संयमाने लढत असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. नाहीतर आपण दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाही, असे संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही समांजस्याची असल्याचं संभाजीराजेंनी आपल्या भाषणात अधोरेखित केलं. यावेळी त्यांनी मतभेद विसरुन लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचे नाही, असे सांगत संभाजीराजेंनी ही लढाई संयमानेच लढली जाईल असे स्पष्ट केले. वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळून द्यायाचा आहे, असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सांगितले.

चहा प्यायला म्हणजे विषय संपला असे होत नाही. अजित पवार कोल्हापूरला घरी जाऊन भेटले त्यावेळी अनेकजण म्हणाले. महाराज मॅनेज झाले वगैरेही चर्चा सुरु झाल्या, पण ज्या दिवशी मॅनेज होईल त्या दिवशी घरी बसेल जाऊन छत्रपती असे नाही मॅनेज होणार माझ्यावर विश्वास ठेवा, अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी या भेटीवरुन टीका करणाऱ्यांना सुनावलं. मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच १४ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला होता. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अजित पवारांनी सोमवारी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे जाऊन शाहू महाराजांची भेट घेत चर्चा केली. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास एक तास बैठक सुरु होती. याच बैठकीनंतर ज्या चर्चा झाल्या त्यावरुन संभाजीराजेंनी टीकाकारांना आज मराठा मोर्चाच्या बैठकीमधील भाषणातून सुनावले.

नांदेडमध्ये मूक मोर्चा…

आता काय करायचं? तुम्ही सांगा काय करायचं? दोन मूक आंदोलनं झाली तरी राजे शांत. महापूर आला म्हणून आम्ही थांबलो. दोन महिने झाले कोव्हिड परस्थिती सुधारते. पण तुम्ही मराठा समाजाचे एवढे आंदोलन झालं. त्यासाठी अजून एक आंदोलन करावे लागणार. आता नांदेडला एक मूक आंदोलन करू, असंही संभाजीराजे म्हणालेत. २० ऑगस्ट रोजी नांदेड येथे मूक आंदोलन होणार होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी