पुणे: कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला आग

Massive fire at Pune fashion street पुण्यात शुक्रवारी रात्री उशिरा कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला आग लागली.

Massive fire at Pune fashion street
पुणे: कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला आग 

थोडं पण कामाचं

  • पुणे: कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला आग
  • आग लागण्याचे कारण अद्याप समजले नाही
  • आगीचा मोठा भडका उडाला

पुणे: पुण्यात शुक्रवारी रात्री उशिरा कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला आग लागली. आग लागण्याचे कारण अद्याप समजले नाही. मात्र आगीचा मोठा भडका उडाला. तातडीने अग्नीशमन दलाच्या आठ बंबगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. याआधी मुंबईत भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली असून अशा पद्धतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही दिले आहेत. (Massive fire at Pune fashion street)

वाढत्या कोविड संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारच्या फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. आजच्या दुर्घटनाग्रस्त रुग्णालयास देखील तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीच मी भंडारा येथे जिल्हा रुग्णालय आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी करुन घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालये व इमारतींमधील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची खातरजमा करुन घेण्यात यावी असे निर्देश मी देत आहे. मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त व महापौर यांच्याशी देखील ही दुर्घटना कळताच चर्चा केली. जखमी तसेच कोविड रुग्णांना इतरत्र व्यवस्थित उपचार मिळतील हे पाहण्यास सांगितले आहे. भांडुपच्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी