Ashadhi Wari : ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकाराम !, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्यनगरीत, दोन दिवस मुक्काम

ashadhi vari 2022 : आळंदी येथील मूळ स्थानावरुन प्रस्थान केल्यानंतर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे आज पुण्यात आगमन झाले. यावेळी हजारो वारकऱ्यांसह पालखीचे पुणेकरांनी भक्तिमय वातावरणात स्वागत केले.

Mauli ... Two days stay of palkhis of Saint Tukaram and Saint Dnyaneshwar in Pune
Ashadhi Wari : ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकाराम !, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्यनगरीत, दोन दिवस मुक्काम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आषाढी पायीवारी संत ज्ञानेश्वर व तुकाराम पालखीचे पुण्यात आगमन
  • दोन्ही पालखींचे दोन दिवसा पुण्यात मुक्काम
  • शुक्रवारी पंढरपूकडे प्रस्थान

पुणे : आळंदीतील अजोळघरातून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या १९२ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. बुधवारी सायंकाळी लाखो वारकऱ्यांसह पालखीचे ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात पुण्यात आगमन झाले आहे. (Mauli ... Two days stay of palkhis of Saint Tukaram and Saint Dnyaneshwar in Pune)

 

अधिक वाचा : 

Ashadhi Wari 2022: पाऊले चालली पंढरीची वारी, आळंदीतून आषाढी वारी पालखी प्रस्थान

आज आळंदीतून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीने पंढरीचा मार्ग धरला. प्रस्थानपूर्वी मध्यरात्री माउलींच्या आजोळी पादुकांना रुद्र्भिषेक करून पंचामृत पूजा, पंच्चपक्व्वान्न नैवद्य, आरती, पसायदान करून काल माउलींच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले. पालखीचे दुपारी दीड वाजता कळस (नगर रस्ता) मध्ये पोहचली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार तसेच अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम महाराजांची पालखीही दुपारी पावणे दोन वाजता बोपोडीतील हॅरिस पूलाजवळ पोहचली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, सहआयुक्त रविंद्र बिनवडे यांनी पालखीचे स्वागत केले.

अधिक  वाचा : 

Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात २४६३९ कोरोना Active, आज ३२६० रुग्ण, ३ मृत्यू

‘ज्ञानोबा-माउली’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संचेती हॉस्पिटलवरून फर्ग्युसन रस्त्याने भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसाव्यासाठी थांबली आहे. उद्या पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असेल. त्यानिमित्त्ताने अवघी पुण्यनगरी ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरामुळे भक्तिमय झाली आहे.  

संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३७ पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी श्रीश्रेत्र देहूगाव येथून पंढरीकडे  सोमवारी सायंकाळी प्रस्थान ठेवले. आज सायंकाळी 'संत तुकाराम महाराज की जय', या जयघोषात पुण्यात आगमन झाले. संचेती पुलाजवळ संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी ५.५२ वाजता आली. पुणे बार असोसिएशनच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला. संत तुकारामांची पालखी नानापेठेतील निवडूंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामाला आहे. 

अधिक  वाचा : 

मुख्यमंत्र्यांचं भावनिक आवाहन, पण शिंदेंनी प्रस्ताव धुडकावला, ४ मुद्द्यात मांडली खदखद 

दोन वर्षांच्या खंडानंतर आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून आणि परराज्यातून हजारो भाविक पुण्यात दाखल झाले आहे. ऊन-सावलीच्या खेळात आणि टाळ-मृदंगांच्या गजरात अवघी पुण्यनगरी दुमदुमून गेली होती.वैष्णवांच्या मांदियाळीचा हा अवीट सोहळा भाविकांना अनुभवायला मिळत होता. महिला भाविकांची मोठी संख्या या वर्षी सोहळ्यात दिसून येत होती. दिंडीतील वारकऱ्यांच्या विठूनामाच्या, ज्ञानेबातुकोबाच्या जयघोषाला भाविकांचीही साथ मिळत होती. त्यानिमित्त्ताने दर्शनासाठी पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरणही दिसून येत आहे. पुण्यात दोन्ही पालख्यांचे दोन दिवस मुक्काम असतो. शुक्रवारी दोन्ही पालख्या आपआपल्या मार्गाने मार्गस्थ होणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी