भाजपच्या 'या' माजी महिला आमदाराने घेतली अजित पवारांची भेट!

पुणे
अजहर शेख
Updated Sep 25, 2020 | 19:41 IST

Medha Kulkarni met Ajit Pawa:विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी त्यांना पक्षांतर्गत अडथळ्यांचा सामना देखील करावा लागणार आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी अजित पवार यांची अचानकपणे भेट घेतली असा अंदाज लावला जातोय.

Medha Kulkarni met Ajit Pawa
भाजपच्या 'या' माजी महिला आमदाराने घेतली अजित पवारांची भेट!   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आगामी विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने कुलकर्णी अजित पवारांच्या संपर्कात?
  • २०१९ च्या निवडणुकीत भाजपने कुलकर्णी यांचा पत्ता केला कट
  • २०१९ च्या विधनासभा निवडणूकी वेळी अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

पुणे: भारतीय जनता पार्टीचे (bharatiya janata party) जेष्ठ नेते एकानाथ खडसे (eknath khadse) हे भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांच्यावर भाजप चांगलेच लक्ष ठेवून असल्याची माहिती देखील सूत्रांनी सांगितली आहे. त्यातच आता भारतीय जनता पार्टीच्या नाराज असलेल्या नेत्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (ex mla medha kulkarni ) यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ncp leader ajit pawar) यांची पुण्यात (pune) भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आगामी विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने कुलकर्णी अजित पवारांच्या संपर्कात?

दरम्यान आजी आमदार मेधा कुलकर्णी या आगामी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान मेधा कुलकर्णी या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र सध्यस्थितीत अनेक भाजपातील नेते हे इतर पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा अनेक वेळा रंगली आहे.

अजित पवारांच्या भेटीची कबुली मात्र...

दरम्यान अजित पवार यांची भेट घेतली असल्याची कबुली मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. मात्र अजित पवार यांची घेतलेली भेट ही राजकीय स्वरूपाची नसून, ती भेट नागरिकांची कामे घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने कुलकर्णी यांचा पत्ता केला कट

२०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने कोथरूड विधनासभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली होती. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत कोथरूडमधून आमदार झालेल्या मेधा कुलकर्णी यांचा पत्ता भाजप नेतृत्वाने कट केला होता. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारल्याने कुलकर्णी यांचे समर्थक पक्ष श्रेष्टीवर नाराज झाले होते. त्यामुळे कुलकर्णी या येत्या निवडणुकीत नेमकी कुठली भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते.

असा बांधला जातोय अंदाज?

मेधा कुलकर्णी यांच्यासह भारतीय जनता पार्टीतील नेते आतापासूनच विधानपरिषदेची फिल्डिंग लावून बसले आहेत. त्यामुळे विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी त्यांना पक्षांतर्गत अडथळ्यांचा सामना देखील करावा लागणार आहे. त्यामुळे राजकीय कोंडी होऊ नये यासाठी मेधा कुलकर्णी यांनी अजित पवार यांची अचानकपणे भेट घेतली असल्याने कुलकर्णी या भारतीय जनता पार्टीला राम राम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करतील आणि राष्ट्रवादीची उमेदवारी घेतील. मात्र अजित पवार यांच्या घेतलेल्या भेटीत कुठलाही राजकीय विषय नव्हता. त्याला कोर्णीही राजकीय रंग देऊ नये, असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी