mhada exam cancelled सरकारवर पुन्हा एकदा नामुष्की , महाडाची परीक्षा रद्द , पेपरफुटी प्रकरणी ३ अटकेत

mhada exam cancelled , 3 arrested : आरोग्य भरतीच्या पेपर फुटीनंतर म्हाडा परीक्षामध्ये देखील पेपर फुटणार होता अशी माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सायबर पोलिसांच्या सातर्कतेने व एमपीएससी समनवय समितीच्या पाठपुराव्यला यश आले आहे. तीन ही आरोपीला पुण्यातून अटक केली आहे.

mhada exam cancelled , 3 arrested
महाडाची परीक्षा रद्द , पेपरफुटी प्रकरणी ३ अटकेत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या तांत्रिक व तांत्रिक सरळ सेवा भरती प्रक्रिया होणार होती
  • गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या तांत्रिक व तांत्रिक सरळ सेवा भरती प्रक्रिया होणार होती
  • आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी उस्मानाबादचे कनेक्शन

पुणे : पोलिसांनी म्हाडा नौकर भरतीच्या परीक्षा पेपर फुटीच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना अटक केली पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सदर कारवाई पुणे सायबर पोलिसांनी केली असून, यामध्ये मोठे मासे गळाला लागले असल्याची माहिती आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आरोग्य भरतीच्या पेपर फुटीनंतर म्हाडा परीक्षामध्ये देखील पेपर फुटणार होता अशी माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सायबर पोलिसांच्या सातर्कतेने व एमपीएससी समनवय समितीच्या पाठपुराव्यला यश आले आहे. तीन ही आरोपीला पुण्यातून अटक केली आहे.

गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या तांत्रिक व तांत्रिक सरळ सेवा भरती प्रक्रिया होणार होती

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या तांत्रिक व तांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्या करिता सरळ सेवा भरती प्रक्रिया होणार होती. यासाठी १२ डिसेंबर , १५ डिसेंबर , १९ डिसेंबर व २० डिसेंबर या ४ टप्प्यात घेण्यात येणारी परीक्षा अपरिहार्य कारणामुळे व तांत्रिक बाबींमुळे पुढे ढकलण्यात आली असून परीक्षेचा वेळ व दिनांक स्वतंत्रपणे कळवला जाईल अशी माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे सचिव यांनी दिलीं आहे.

आरोग्य भरतीचा पेपर १०० जणांपर्यत गेल्याची शक्यता असुन किती पैसे घेण्यात आले याचा तपास सुरू

आरोग्य भरतीच्या गट ड आणि क च्या पेपरफुटीप्रकरणी सायबर पोलिसांच पथक बीडमध्ये आहे. मराठवाड्यातून पेपर फुटल्यानं पथक मराठवाड्यातचं तळ ठोकून आहे. महेश बोटले आणि प्रशांत बडगिरे यांना अटक केली असून १५ जणांना अटक केली आहे. आरोग्य भरतीचा पेपर १००  जणांपर्यत गेल्याची शक्यता असुन किती पैसे घेण्यात आले याचा तपास सुरू आहे.

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी उस्मानाबादचे कनेक्शन

काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी उस्मानाबादचे कनेक्शन समोर आले होते. याप्रकरणी भूम ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड, ग्रामीण रुग्णालयाच्या सहायक अधिक्षक कार्यालयातील क्लार्क राजेंद्र सानप या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. संदीप जोगदंड यांची दोन महिन्यापूर्वी अंबेजोगाई येथे बदली झाली आहे. तर या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक झाली आहे तर यापूर्वी सहा जणांना अटक झाली आहे. 

पेपरफुटीचे प्रकरण आरोग्य विभागाची नाचक्की करणारे ठरले होते.

आरोग्य विभाग गट ड साठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा झाली होती. हे पेपरफुटीचे प्रकरण आरोग्य विभागाची नाचक्की करणारे ठरले होते. सानप याने सहा लाख रुपये देऊन पेपर मिळविल्याची माहिती आहे. संदीप जोगदंड हा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे वैद्यकीय अधीक्षक होता, त्यांची २ महिन्यांपूर्वी बदली झाली होती त्यापूर्वी हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी