MHADA Pune lottery live Updates । पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) (MHADA) अंतर्गत २ हजार ८२३ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एक हजार ३९९ सदनिका (Flats) अशा एकूण ४ हजार २२२ नवीन सदनिकांसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये सकाळी दहा वाजेपासून ऑनलाइन सोडत (Online Draw) सुरू झाली ही प्रक्रिया दुपारी साडे चार वाजता संपली. त
पुणे म्हाडाची नोव्हेबर २०२१ ची सोडत पूर्ण झाली असून सायंकाळी पाच वाजून ३० मिनिटांनी लकी विजेत्यांच्या नावांची यादी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच त्यांची एक कॉपी म्हाडा कार्यालयाच्या बाहेर डिस्प्ले बोर्डवर लावण्यात येणार असल्याचे म्हाडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
यशस्वी विजेत्यांना मेसेज आणि इमेलच्या माध्यमातून कागद पत्र सूपूर्द करण्याची सूचना देण्यात येणार आहे. तसेच या संदर्भात पुणे म्हाडाकडून कॅम्पही लावण्यात येणार असल्याचेही म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले.
म्हाडाच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ १६ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. या चार हजार २२२ सदनिकांसाठी ८० हजार ८४८ अर्जदारांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यापैकी ६५ हजार १८० अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीमध्ये सहभाग नोंदविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनामध्ये व्हिडिओ कॉन्फरसद्वारे ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीच्याचा कार्यक्रम महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, पुणे खंडपीठाचे न्यायिक सदस्य एम.एम.पोतदार, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषदेत केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सर्व अर्जदारांना फेसबुक लाइव्ह व युटूब लाइव्हची लिंक पाठवण्यात येणार असून, लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन सोडतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे.