पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे सतत कुठल्या न कुठल्या कारणावरून चर्चेत असतात. सध्या ते त्यांच्या दौऱ्यासाठी आखण्यात आलेल्या एका पत्रामुळे चर्चेत आले आहेत. सावंत यांच्या दौऱ्यात घर ते कार्यालय असा प्रवास आखण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याची सोशल मिडियावर खिल्ली उडवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा माहिती कार्यालयाकडून त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा जाहीर करण्यात आला. तानाजी सावंत हे तीन दिवस पुण्यात (Pune) असणार आहेत.
अधिक वाचा : उपराजधानीला काळजी घेण्याची गरज, जिल्ह्यात Swine Fluचं थैमान
तानाजी सावंत हे पुढच्या तीन दिवसासाठी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौर्यात मंत्री तानाजी सावंत हे पुण्यातील कात्रज भागातील त्यांच्या घरून निघून कात्रजमधील बालाजी नगर भागातील त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात जाणार आणि तिथून पुन्हा त्यांच्या घरी परतणार एवढा प्रवास करणार आहे. त्यामुळे, इतर कुठलाही कार्यक्रम नसून फक्त घर ते ऑफिस आणि ऑफस ते घर असाच दौरा तानाजी सावंत यांचा असल्याचा या दौऱ्यात असल्याने तानाजी सावंत यांच्या या दौऱ्याची सोशल मिडियावर खिल्ली उडवली जाऊ लागली आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांच्या कात्रज मधील घरापासून त्यांच्या उद्योग समूहाचे कार्यालय अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. मात्र तीन दिवसांत मंत्री घर ते उद्योग समूहाचे कार्यालय आणि पुन्हा घर या दरम्यानच प्रवास करणार आहेत. तानाजी सावंत यांचा हा दौरा सोशल मिडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्राचे पुत्र उदय लळीत आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार
मंत्री एखाद्या दौऱ्यावर आला तर, सभा किंवा कार्यकर्ता मेळावा, पत्रकार परिषद अशा कार्यक्रमांचा सपाटा लावतात. त्याचबरोबर, ते महत्वाच्या व्यक्तीच्या बैठका देखील घेत असतात. मात्र, राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या सावंतांच्या दौऱ्यात अशा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम दिसून येत नाही. मात्र, दौऱ्यात प्रवासादरम्यान पोलीसांचा कॉनव्हॉय तैनात असल्याने सगळीकडे या दौऱ्याची चर्चा होत आहे. सावंत यांच्या दौऱ्यावरून विरोधकांनी देखील त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी फेसबुकवर त्यांच्या दौऱ्याचा फोटो शेअर करत या अजब दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. 'हा किती कामाचा दौरा आहे पहा,महाराष्ट्राची वाटोळे करणारे हेच अडाणी लोक घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर', अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली आहे.
अधिक वाचा : Neeraj Chopraचे दमदार कमबॅक, पहिल्याच थ्रोमध्ये रचला इतिहास