पुणे : हॉटेलवर (Hotel) जेवण करायला जाणं हे सगळ्यांच्या आवडीचं. छोट्या असो कि मोठ्या पदाचा माणूस असो सर्वजण हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी उत्साहित असतात. परंतु जेवणाचा बेत कधी-कधी आपल्या जिवावर बेतू शकतो. शिंदे गटातील (Shinde group) आमदार उदय सामंतांनाही (MLA Uday Samant) हॉटेलमध्ये जेवणं महागात पडलं. जेवणासाठी ताफा सोडून हॉटेलचा रस्ता पकडला पण ताफ्यावर हल्ला झाल्यानं त्याचा हा बेत चांगलाच महागात पडला.
मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुण्यात दौरा होता, या कार्यक्रमात शिंदे गटातील अनेक आमदारांनी उपस्थिती लावली. या आमदारांमध्ये उदय सामंत हे देखील होते. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर तानाजी सावंत यांच्याकडे जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत निघालेल्या उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाला. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या हल्ल्याविषयी एक नवीन अपडेट आली आहे. उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना जिथे घडली तो ताफ्याचा रस्ता नव्हता, घटना वेगळ्या ठिकाणी घडली, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्ष जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.
Read Also: क्रिकेटमध्येही पुरुष गडीला भारी पडल्या बाया, वाचा टॉप विक्रम
उदय सामंत हे तान्हाजी सावंतांकडे जात नव्हते तर मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा सोडून ते हॉटेलमध्ये जेवायला निघाले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम आटोपून ठरवून दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कॅानव्हॅायचा मार्ग सोडून निसर्ग हॅाटेलला जेवण्यासाठी निघाले होते. निसर्ग हॉटेल हे पुण्यात प्रसिद्ध असे हॉटेल आहे. त्यामुळे इथं खवय्यांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे उदय सामंत यांनी निसर्ग हॉटेलचा बेत आखला होता.
Read Also : शिवसेना संपविण्याचा डाव समोर आला - उद्धव ठाकरे
परंतु उदय सामंत यांना सामान्य व्यक्तीसारखा अनुभव आला तो म्हणजे जे ठरवतो ते होतच नाही. त्याच असं की, निसर्ग हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा म्हणून त्यांनी ठरवलं होतं. मग निसर्ग हॉटेलवर जायचं कसं म्हणून उदय सामंत यांच्या ताफ्याने गुगल मॅपवरून जाण्याचा निर्णय घेतला.
मग काय गुगलवरून जसा मार्ग दिसत होता, त्यानुसार, ताफा पुढे जात होता. गूगल मॅपने त्यांना आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी पोहोचवलं, अशी माहिती अतिवरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक हजर होते. त्यामुळे उदय सामंत यांचा ताफा पाहिल्यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोड झाला. शिवसैनिकांनी उदय सामंत यांना गाडीत बघितलं त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत हल्ला केला.
Read Also : कोरोना लसीकरण मोहीम संपताच देशात लागू होणार 'CAA '- अमित शहा
या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. पण, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. उदय सामंत यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या तीन गाड्या होत्या.