मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा पावसामुळे रद्द

पुणे
Updated Oct 09, 2019 | 17:56 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द केली आहे. राज यांची ही पहिली प्रचारसभा होणार होती.

Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा पावसामुळे रद्द  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा रद्द
  • सभेस्थळी मुसळधार पाऊस, मैदानात चिखलाचं साम्राज्य
  • पुण्यातील सरस्वती शाळेच्या मैदानावरुन राज ठाकरे विधानसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा होणार होता.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. आज पुण्यातील सरस्वती शाळेच्या मैदानावरुन राज ठाकरे विधानसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा होणार होता. सभेच्या ठिकाणी मुसळधार होत असल्यानं मनसेनं ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांची ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली प्रचारसभा होणार होती. काल रात्री पुण्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मैदानावर चिखल आणि पाणी साचलं होतं. त्यानंतर सभेवर पावसाचं सावट असल्याचं बोललं गेलं. तरीही सुद्धा मनसेचे नेते, कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर मैदानावर साफसफाईचं काम केलं. तरीही मुसळधार पावसानं खूप नुकसान झालं. आताच्या पावसामुळे मैदानात चिखल आहे. मैदानातील खुर्च्यांही पाण्यात गेल्यात. पावसामुळे सभेसाठी उभारलेलं स्टेज, साऊडं सिस्टमचंही नुकसान झालं आहे.  राज ठाकरे यांच्या सभेसाठी काल पुण्यात मैदान मिळालं होतं. किशोर शिंदेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे पुण्याला गेले आहेत. आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 

दरम्यान निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या आणखीन दोन सभा पुण्यात नियोजित करण्यात आल्या आहेत. त्यातच आणखीन एक सभा घेण्याची विनंती राज ठाकरेंना करणार असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.ज्यामुळे आज रद्द झालेल्या सभेची भरपाई करून घेता येईल.

राज ठाकरे यांची सभा रद्दः

  1. मुंबईत उद्या दोन प्रचारसभा होतील. त्यातली एक सांताक्रुझ आणि दुसरी गोरेगाव येथे होईल.
  2. राज ठाकरे यांची उद्या मुंबईत पहिली प्रचारसभा होणार 
  3. राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा रद्द
  4. राज ठाकरेंना सभा रद्द करावी लागणार?
  5. राज ठाकरेंच्या सभेस्थळी मुसळधार पाऊस
  6. आजपासून मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार
  7. पावसामुळे सभेच्यास्थळी चिखलाचं साम्राज्य
  8. किशोर शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे पुण्यात
  9. राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेवर पावसाचं सावट
  10. राज ठाकरे यांच्या सभेला थोड्याच वेळात सुरूवात होणार

मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. पण त्यावेळी राज ठाकरेंनी भाजपविरोधात संपूर्ण राज्यात प्रचार केला होता. यासाठी अनेक सभा देखील होत्या. त्यावेळी राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' हा फॉर्म्युला खूपच हिट झाला होता. पण प्रत्यक्ष मतदानात त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचं दिसून आलं होतं. पण राज ठाकरेंच्या भाषणाप्रमाणेच त्यांच्या या फॉर्म्युलाची खूपच चर्चा झाली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आता प्रचारात कोणती नवी क्लुप्ती शोधून काढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा पावसामुळे रद्द Description: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द केली आहे. राज यांची ही पहिली प्रचारसभा होणार होती.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles