मनसैनिक ब्रिजभूषणची तंगडी तोडल्याशी स्वस्थ बसणार नाही, मनसेच्या 'या' नेत्याने दिला इशारा

mns leader vaibhav khedekar targeted bjp mp brijbhushan : मनसे आणि उत्तर प्रदेश येथील खासदार ब्रिजभूषणसिह यांच्यात वाद वाढत चालला आहे.

mns leader vaibhav khedekar targeted bjp mp brijbhushan
मनसैनिक ब्रिजभूषणची तंगडी तोडल्याशी स्वस्थ बसणार नाही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मनसे आणि उत्तर प्रदेश येथील खासदार ब्रिजभूषणसिह यांच्यात वाद वाढत चालला आहे
  • ‘हिंदू असून हिंदूला विरोध करणाऱ्या या नालायकाला गाडू’
  • ‘हा सुपारीबाज ब्रिजभूषण हिंदू असून हिंदूना विरोध करतो ही खंत आहे’ – मनसे

पुणे : मनसे आणि उत्तर प्रदेश येथील खासदार ब्रिजभूषणसिह यांच्यात वाद वाढत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जून महिन्यात अयोध्या जाणार असल्याचं जाहीर केल्यावर उत्तर प्रदेश येथील खासदार ब्रिजभूषणसिह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतर अयोध्येत पाऊल ठेवावे असा इशारा ब्रिजभूषणसिह यांनी दिला होता. दरम्यान, राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला असून, पुढे ते कधी अयोध्येला जाणार आहेत यांची तारीख मात्र, सांगितली नाही. ठाकरे यांचा दौरा जरी स्थगित झाला असला तरी खासदार ब्रिजभूषणसिह हे ठाकरे यांच्यावर सतत निशाणा साधत आहेत. ब्रिजभूषणसिह यांच्या सततच्या वक्तव्याला मनसेचे नेते पदाधिकारी यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. राज ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो ब्रिजभूषण ने या महाराष्ट्राच्या मातीत पाय ठेवून दाखवावा, त्याची तंगडी तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसेचे खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ब्रिजभूषण यांना दिला आहे.

अधिक वाचा ; कारागृह अधीक्षकांच्या मुलाची कोयत्याने सपासप वार करून हत्या

‘हिंदू असून हिंदूला विरोध करणाऱ्या या नालायकाला गाडू’

नगराध्यक्ष आणि मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी एका व्हिडीओच्या यांनी एक व्हिडीओ व्हायरल करत म्हटलं आहे की, मराठी माणसाला डुबवण्याची भाषा करणाऱ्या आणि एक हिंदू असून हिंदूला विरोध करणाऱ्या या नालायकाला या महाराष्ट्राच्या मातीत मातीत गाडल्याशिवाय एक महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही. राज ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो ब्रिजभूषण ने या महाराष्ट्राच्या मातीत पाय ठेवून दाखवावा, त्याची तंगडी तोडल्याशिवाय राहणार नाही असंही खेडेकर यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; OTT वर झळकण्यासाठी हिरोपंती २ सज्ज, या दिवशी होणार प्रदर्शित 

‘हा सुपारीबाज ब्रिजभूषण हिंदू असून हिंदूना विरोध करतो ही खंत आहे’ – मनसे

एमआयएमच्या त्या अकबरुद्दीन ओवेसीने औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली दर्शन घेतलं, त्याबाबत ब्रिजभूषण ने एक चकार शब्दही काढला नाही. हा सुपारीबाज ब्रिजभूषण हिंदू असून हिंदूना विरोध करतो ही खंत आहे. असंही खेडेकर यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; अपरा एकादशीच्या दिवशी या १० नियमांचे करा पालन, वाचा सविस्तर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी