'चंपा'बाबत असं काही बोलले राज ठाकरे...अन् हशा पिकला...

पुणे
पूजा विचारे
Updated Oct 14, 2019 | 21:54 IST

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या कसबा पेठे येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर चांगलंच धारेवर धरलं. या सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Raj Thackeray
'चंपा'बाबत असं काही बोलले राज ठाकरे...  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या कसबा पेठे येथे प्रचारसभा घेतली.
  • या सभेत राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे कोथरूड मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
  • अजय शिंदे.... चंपाची चंपी करणार असा टोला राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.  

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या कसबा पेठे येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर चांगलंच धारेवर धरलं. पण या सभेत राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे कोथरूड मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. अजय शिंदे.... चंपाची चंपी करणार असा टोला राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.  

राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली. त्यानंतर काही मिनिटांतच लोकांमधून चंपा चंपा असा आवाज येऊ लागला. दोन मिनिटं राज ठाकरे यांना काही समजलंच नाही की, लोकं काय म्हणत आहेत. त्यानंतर स्टेजवर असलेल्या एकानं राज ठाकरे यांच्या कानात 'चंपा' असं सांगितलं. यावेळी राज ठाकरे यांना हसू आवरलं नाही आणि ते हसले. त्यानंतर पटकन राज ठाकरे  म्हणाले की, पुणेकर नाव ठेवण्यात पटाईत आहेत.  राज ठाकरे पुढे म्हणाले, हा पाहा आमचा अजय शिंदे, चंपाची चंपी करणार आहे. 

एवढ्यावरच राज ठाकरे थांबले नाही तर ते पुढे म्हणाले की, कोल्हापुरात पूर आला, सरकारमधला मंत्री कोथरूडपर्यंत वाहत आला. काही घरंगळत जातात, हे वाहत आलेत. चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघात दिलेल्या उमेदवारीवरून त्यांना टोला हाणला आहे.  महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आला, अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीवर टीका केली आहे.

आज राज ठाकरे यांची पुण्यात कसबा पेठ येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेना भाजपला चांगलंच धारेवर धरलं. सभेत त्यांनी स्मार्ट सिटी, पीएमसी बँक, गड किल्ल्यांचा प्रश्न यावरून निशाणा साधला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी सभा घेतली. गेल्यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राज ठाकरे पुण्यात फोडणार होते. मात्र मुसळधार पावसामुळे त्यांची सभा रद्द करावी लागली होती.

अजित पवारांकडून चंपा असा उल्लेख 

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना चंद्रकांत पाटलांचा चंपा असा उल्लेख केला. चंपा हा शॉर्ट फॉर्म आहे, अप म्हणजे अजित पवार तसं चंपा, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी