पुणे: स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandre) यांनी लिहलेला शिवछत्रपतीचा इतिहासाचा वाद पुन्हा उफळण्याची निर्माण झाला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (२३ जुलै) पुण्यात (Pune) शिवचरित्र ग्रंथ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाषण करताना बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर पुन्हा एकदा टीका (criticism) केली आहे. (most injustice done to shivaji maharaj by writings of babasaheb purandre criticism of sharad pawar once again)
'माझ्या मते बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणातून शिवछत्रपती यांच्यावर सर्वाधिक अन्याय झाला.' असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
शिवचरित्र ग्रंथ प्रकर्षण सोहळा आज पुण्यामध्ये पार पडला. त्यावेळी भाषणात ते बोलत होते. शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचं प्रकर्षण आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पावर याच्या हस्ते झाले. यावेळी इतिहास अभ्यास राजकुमार घोगरे, श्रद्धा कुंभोजकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते.
अधिक वाचा: Shivsainik's agitation : शिवसैनिकांचे उग्र आंदोलन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
'बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणातून शिवाजी महाराजांवर खूप अन्याय'
शरद पवार यावेळी भाषणामध्ये म्हणाले की, 'महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता कुळवाडीभूषण असा केला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपती यांच्यावर इतका अन्याय कोणी केला नाही.'
'शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला. अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या. त्या फक्त जिजाऊ होत्या.'
'सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही.' असं भाषण करताना शरद पवार यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. मात्र, या वक्तव्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहासाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
अधिक वाचा: पुरंदरेंनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या; संभाजी ब्रिगेडचा आरोप
दरम्यान, तत्कालीन फडणवीस सरकारने जेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने याला प्रचंड विरोध केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बाबासाहेबांना चुकीच्या पद्धतीने सांगितला असून त्यांचं लिखाण हे वादग्रस्त आहे. अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा अशाच स्वरुपाचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे आतापर्यंत कायमच बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणाची पाठराखण करत आलेला भाजप शरद पवार यांच्या या वक्तव्याला नेमकं काय प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे याबाबत काय भूमिका घेतात याकडेही आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.