Crime News आईने पोटच्या अल्पवयीन मुलीचं स्वतःच्या प्रियकरासोबत लावलं लग्न, आत्महत्येची धमकी देत शारिरीक संबंध ठेवण्यास केले प्रवृत्त

mother getting her boyfriend married with minor daughter, fir filed : पिडीत मुलगी आणि तिची आई ही पुणे शहरापासून जवळच असलेल्या वडगाव शेरी भागात राहात आहे. पिडीत मुलीच्या आईचे एका व्यक्तीसोबत अनेकवर्षापासून प्रेमसंबंध होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. पिडीतेच्या आईने सदर व्यक्तीसोबत पिडीतेचे बळजबरीने लग्न लावून दिले.

mother getting her boyfriend married with minor daughter, fir filed
आईने पोटच्या अल्पवयीन मुलीचं स्वतःच्या प्रियकरासोबत लावलं लग्न  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जन्मदात्या आईने चक्क आपल्या पोटच्या मुलीचे लग्न हे स्वतच्या प्रियकरासोबत लावून दिले
  • तू त्याच्याशी लग्न केलं नाही, तर मी जीव देईल, अशी धमकी आईने मुलीला दिली होती
  • पिडीतेच्या आईवर आणि 28 वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल

पुणे : आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, सदर घटनेने पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जन्मदात्या आईने चक्क आपल्या पोटच्या मुलीचे लग्न हे स्वतच्या प्रियकरासोबत लावून दिले असल्याचे उघड झाले आहे. आई आणि मुलीचं नातं अतिशय पवित्र आणि निस्वार्थी मानल जातं, मात्र, काहीवेळा याउलट समाजात घडताना पहायला मिळत असतं. (mother forced her minor daughter to marry boyfriend in pune )

अधिक वाचा ; थंडीत वजन कमी करण्यासाठी वापरा मेथीचे दाणे आणि पहा फरक

तू त्याच्याशी लग्न केलं नाही, तर मी जीव देईल, अशी धमकी आईने मुलीला दिली होती

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी आणि तिची आई ही पुणे शहरापासून जवळच असलेल्या वडगाव शेरी भागात राहात आहे. पिडीत मुलीच्या आईचे एका व्यक्तीसोबत अनेकवर्षापासून प्रेमसंबंध होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. पिडीतेच्या आईने सदर व्यक्तीसोबत पिडीतेचे बळजबरीने लग्न लावून दिले. त्याचसोबत या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासही भाग पाडलं. पिडीत मुलगी लग्नाला तयार होत नव्हती तर तू त्याच्याशी लग्न केलं नाही, तर मी जीव देईल, अशी धमकी तिने मुलीला दिला. दरम्यान, लग्नाच्या अगोदर पिडीतेच्या आईने मुलीला हेच तुझे वडील आहेत असं देखील सांगितलं होतं. मात्र काही दिवसांनंतर आईनेच मुलीला त्याच व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी भाग पाडलं.

अधिक वाचा ; अखेर 2000 रुपयांच्या नोटा का गायब झाल्या आहेत? पाहा कारण 

पिडीतेच्या आईवर आणि 28 वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल

पोलिसांनी पीडित मुलीची आई आणि तिच्या प्रियकराविरोधात बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सदर प्रकरणातील पिडीत मुलीच्या आईचे वय हे 36 वर्षे असून, तिच्या प्रियकराचे वय हे 28 वर्ष इतके आहे. पोलिसांनी पिडीतेची आई आणि प्रियकराला अटक केली आहे. महिलेच्या प्रियकराने या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचारही केला. अखेर या मुलीने शाळेतील आपल्या एका मित्राला याबद्दल सांगितलं आणि या प्रकरणाचा खुलासा झाला. असून पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा ; अरे देवा! आता Amazonमधील 3766 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी