MPSC परीक्षा : राज्यात प्रथम येणाऱ्या चौगुलेचे पप्पा आहेत टेम्पो चालक अन् आई आहे शिवणकाम करणारी

पुणे
भरत जाधव
Updated Apr 30, 2022 | 00:51 IST

राज्य सेवा परीक्षा (State Service Examination) २०२१ च्या परीक्षार्थींच्या (Examiners) मुलाखती (Interviews) आज संध्याकाळी 6च्या सुमारास पार पडल्या. मुलाखती झाल्यानंतर अवघ्या दीड तासात या परीक्षेचा निकाल (Result) जाहीर झाला. या परीक्षेत ६१२ गुण मिळवून प्रमोद बाळासाहेब चौगुले (pramod chowgule) हा प्रथम आला आहे. 

MPSC exams : Chowgule first in the state
राज्यात प्रथम येणाऱ्या चौगुलेचे पप्पा आहेत टेम्पो चालक   |  फोटो सौजन्य: Times Now

पुणे : राज्य सेवा परीक्षा (State Service Examination) २०२१ च्या परीक्षार्थींच्या (Examiners) मुलाखती (Interviews) आज संध्याकाळी 6च्या सुमारास पार पडल्या. मुलाखती झाल्यानंतर अवघ्या दीड तासात या परीक्षेचा निकाल (Result) जाहीर झाला. या परीक्षेत ६१२ गुण मिळवून प्रमोद बाळासाहेब चौगुले (pramod chowgule) हा प्रथम आला आहे. 

प्रमोद चौघुले यांनी २०१५ पासून  स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. यश अपयशांच्य गर्तेत अडकलेला या संघर्षयोध्याने अखेर यावर्षी यश मिळालं आहे. गेल्या परीक्षेत त्यांचा क्रमांक एक मार्काने हुकला होता. आता ते थेट राज्यातून पहिले आले आहेत. निकाल जाहीर होताच प्रमोदच्या मित्राने त्याचं स्वागत केलं आणि एकच जल्लोष केला. यावेळी प्रमोद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.आपल्या यशा बोलताना प्रमोद चौगुले म्हणाले की, हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. कोरोना काळात सांगलीत पूर आला होता. तेव्हाच त्यांच्या घरचे सगळे करोना पॉझिटिव्ह आले होते. प्रमोद एकटे अभ्यास करत होते. अशा बिकट परिस्थितीत मार्ग काढून यश मिळवलं.  प्रमोदचे वडील टेम्पो चालवतात तर आई शिवणकाम करते. घरी अर्धा एकर शेती. अशा हालाकीच्या परिस्थितीत प्रचंड मेहनत करून प्रमोद चौघुलेने यशाला गवसणी घातली आहे.

दरम्यान, कोव्हिड साथीमुळे या प्राथमिक परीक्षेला विलंब झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. मात्र, राज्य लोकसेवा आयोगाने त्यानंतर वेगाने पावले टाकली. डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा संपली. एप्रिलमध्ये मुलाखती पार पडल्या. मुलाखतींनंतर तीन-चार महिन्यांनी निकाल लागण्याची परंपरा होती. ती परंपरा खंडीत करत मुलाखत संपताक्षणीच निकाल जाहीर झाला आहे. 

चौगुलेच्या नंतर नितेश नेताजी कदमहा ५९१ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर रुपाली गणपत माने हिने ५८०.२५ गुण मिळवून मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेद्वारे वर्ग एकची पदे भरण्यात येणार आहेत. या परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार ही पदे भरण्यता येणार नव्हती. तर इतर वर्ग एकची पदे भरण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी