पुणे : या वर्षाची बहुप्रतिक्षित स्पर्धा मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ इंडिया २०२१ चा ग्रँड फिनाले नुकताच क्लासिक रॉक, कल्याणीनगर, पुणे येथे पार पडला. या स्पर्धेसाठी ३०० हून अधिक इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणीं केली होती ज्यामधुन निवडलेल्या १५ स्पर्धकांनी पुण्यातील ग्रँड फिनालामध्ये सहभाग घेतला होता.
ज्यामध्ये राधिका सुधीरला मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ इंडिया २०२१ च्या सन्मान बहल करण्यात आला तर हर्षाली कोलते फस्ट १ रनर अप आणि प्रियंका शिंपी द्वितीय रनर अप ठरली. या स्पर्धेस पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.यासाठी पल्लवी कौशिक स्पर्धेच्या विविध राऊंडच्या कोरियोग्राफर होत्या आणि अंतिम फेरीमध्ये परीक्षकांच्या प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर विजेत्यांची निवड करण्यात आली.
या तिन्ही विजेत्यांनी उत्तम वेशभूषेबरोबरच आपल्या उत्तरांनी व व्यक्तिमत्वाची चमक दाखवत परिक्षकांना प्रभावित केले आणि ही स्पर्धा जिंकली.
यावेळी मंजुषा मुळीक, इंडिया इंटरनॅशनल क्वीन ऑफ क्वीन्सच्या विजेत्या , डॉ. मृणाली कदम, मिसेस महाराष्ट्र आणि मिसेस इंडियाच्या ब्रँड अॅम्बेसेडर, रुपाली सावंत, मिसेस इंडिया एम्प्रेस आणि अॅडव्होकेट उर्मिला जाधव, मिसेस दिवा इंटरनॅशनल अॅण्ड वंडर वुमन विनर या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन उपस्थित होत्या.
ही एक भव्य स्पर्धा होती आणि पुण्यातील इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रणेते जॅझमटाझ वर्ल्डचे साजिद शेख या स्पर्धेचे आयोजक होते. जॅझमटाझ वर्ल्ड ने जानेवारी २०२२ पासुन एम्प्रेस अॅण्ड एम्परर ऑफ पुणे आणि प्रिन्स अॅण्ड प्रिंसेस ऑफ पुणे या दोन नवीन टायटलची सुरूवात केली आहे. इच्छुक उमेदवार jazzmatazzworld@rediffmail.com किंवा ९८९०६२७३२३ वर संपर्क साधू शकतात.