Good News for Student : शिक्षण मंडळ परत करणार अकरावी प्रवेश परीक्षेचे शुल्क 

Education News in Marathi । गेल्या वर्षी दहावीचा निकाल इव्हॅल्यूवेशन (मुल्यांकन) आधारित करण्यात आल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी (Class 11th common entrance test) परीक्षा घेण्यात येणार होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सीईटी रद्द करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार परीक्षा रद्द (Exam Canceled) करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 MSBSHSE  maharashtra board to refund fyjc online entrance exam fees 2021 Education News in Marathi
शिक्षण मंडळ परत करणार अकरावी प्रवेश परीक्षेचे शुल्क  
थोडं पण कामाचं
  • शिक्षण मंडळ परत करणार अकरावी प्रवेश परीक्षेचे शुल्क 
  • विद्यार्थ्यांना १४३ रुपये परत केले जाणार
  • सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या ४४ हजार विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क

Maharashtra board to refund fyjc Fee ।  मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE)इयत्ता अकरावीसाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा (Class 11th common entrance test) गेल्या वर्षी  रद्द करण्यात आली होती. यामुळे या परीक्षेसाठी घेण्यात आलेली फी ( Exam Fee ) विद्यार्थ्यांना परत करण्यात येणार आहे. ज्या पेमेंट गेटवेद्वारे फी भरण्यात आली, त्याचमार्फत विद्यार्थ्यांना १४३ रुपये परत केले जाणार असल्याचे राज्य मंडळाने (MSBSHSE)म्हटले आहे.

CBSE दहावी, बारावी टर्म १ च्या परीक्षांच्या निकालासंदर्भात ही महत्वाची बातमी

गेल्या दहावीचा निकाल मूल्यमापनावर आधारित जाहीर झाल्याने अकरावी प्रवेशासाठी परीक्षा (Class 11th common entrance test) घेतली जाणार होती. या सीईटीसाठी राज्यभरातून १० लाख ९८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सीबीएसई, सीआयएससीई व आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या ४४ हजार विद्यार्थ्यांचाही यामध्ये समावेश होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीईटी रद्द (common entrance test)करण्याचे निर्देश राज्य शासनाला  (State Govt) दिले होते. त्यानुसार परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

CBSE दहावी, बारावी टर्म १ च्या परीक्षांच्या निकालासंदर्भात ही महत्वाची बातमी

'सीईटी'साठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही फी घेण्यात आली नव्हते. मात्र सीबीएसई, सीआयएससीई व आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १४३ रुपये फी घेण्यात आली होते. मात्र परीक्षाच रद्द झाल्याने परीक्षा फी परत मिळावे, अशी मागणी विद्यार्थी, पालक व संघटनांनी केली होती. यानुसार हे फी त्यांना लवकरच परत करण्यात येणार आहे.

राज्य मंडळाच्या वेबसाइटवर २०५२ आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक या वेबसाइटवर ४१,५८२ विद्यार्थ्यांनी ज्या पेमेंट गेटवेद्वारे व ज्या माध्यमातून परीक्षा फी जमा केली आहे, त्याच मार्गाने प्रति विद्यार्थी १४३ रुपयांप्रमाणे परीक्षा शुल्काचा परतावा करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.

SSC And HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'आनंदाची बातमी';  शिक्षण मंडळाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

दहावी, बारावीच्या परीक्षेचे  विलंब शुल्क माफ

SSC And HSC Exam ।  इयत्ता दहावी आणि बारावीच्या २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरण्यासाठी आकारण्यात येणारे विलंब शुल्क माफ करण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरल्यानंतर विलंब शुल्कासह (late Fee) विद्यार्थ्यांना अर्ज भरावा लागतो. त्यात लेट फीचेही टप्पे असतात, अनेकदा हा लेट फी हजाराच्या घरात जाते. त्यामुळे काही विद्यार्थी परीक्षेला रिजिस्ट्रेशन करत नाहीत. यंदा मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत नियमित शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज भरता येईल असे स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी